घरदेश-विदेश'एसी'त बसणारे नेते लोकप्रियता दाखविण्यासाठी... खारघर घटनेवरून ममतांची अमित शाहांवर टीका

‘एसी’त बसणारे नेते लोकप्रियता दाखविण्यासाठी… खारघर घटनेवरून ममतांची अमित शाहांवर टीका

Subscribe

कोलकाता : पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्या हस्ते रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवी मुंबईतील खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात हा भव्य पुरस्कार सोहळा पार पडला. पण या सोहळ्याला उपस्थित 13 श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. यावरून तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal chief minister Mamata Banerjee) यांनी या सोहळ्यावर उपस्थित नेत्यांवर टीका केली आहे.

- Advertisement -

खारघर येथे आयोजित भव्य सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याला मुंबईसह वेगवेगळ्या जिल्ह्यातून लाखो लोक आले होते. उन्हाचा पारा वाढलेला असतानाच हा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास सुरू झाला. त्यातील 13 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, एसीत राहणाऱ्यांनी आपली लोकप्रियता दाखविण्यासाठी लोकांना रणरणत्या उन्हात बसवून ठेवल्याची टीका केली आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह रविवारी कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात गेले होते. हे नेते स्वतः सावलीत राहतात, एसीमध्ये राहतात. पण लोकप्रियता दाखवण्यासाठी लोकांना बाहेर या कडक उन्हात बसवण्यात आले. लोकांनी कार्यक्रमातून सबाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली, पण त्यांना बाहेर जाऊ दिले नाही. त्यामुळे उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू झाला तर, 600 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

- Advertisement -

अतिक-अशरफ हत्येवरून केंद्रावर टीका
ममता बॅनर्जी यांनी, अतिक-अशरफ हत्याकांडप्रकरणी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला. मी कोणत्याही प्रकारे गुन्ह्याचे समर्थन करणार नाही. पण भाजपच्या राजवटीत जे घडले आणि जे घडत आहे ते चुकीचे आहे. जर कोणी न्यायालयीन कोठडीत असेल आणि त्याला बाहेर नेण्यात आले तर त्याला मारले जाते. ज्याला वाटेल त्याला मारले जात आहे. देशात काय चालले आहे? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.

केंद्राला ममतांचा इशारा
ममता बॅनर्जी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कालावधी पूर्ण होण्यापूर्वी माझे सरकार पाडण्याची धमकी देणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, असे त्या म्हणाल्या. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने चालतो. आम्ही एकत्र काम करतो, त्यामुळेच आम्ही अनेकवेळा बोलत नाही. पण ‘हमसे कोई टकराएगा तो चूर-चूर हो जाएगा,’ असा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -