घरताज्या घडामोडीबळीराजाला मदत देण्यास भाग पाडू

बळीराजाला मदत देण्यास भाग पाडू

Subscribe

जी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी मुख्यमंत्री असताना घेतली होती, त्याची पूर्तता करण्याची संधी आता या सरकारकडे आहे. त्यांनी शेतकर्‍यांना आता त्याचप्रमाणे मदत करावी, अशी मागणी करतानाच संकटात सापडलेल्या शेतकर्‍याला मदत करण्यासाठी सरकारला भाग पाडू, असे आश्वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्यातीलऔसा तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली त्यांनतर त्यांनी आशिव, शिवली मोड आणि बुधोडा येथे शेतकर्‍यांशी संवाद साधला. मी मुख्यमंत्री असताना झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकर्‍यांना मदतीसाठी केलेले वक्तव्य जरी सद्यःस्थितीत पूर्ण केले तरी भरपूर आहे.

- Advertisement -

अतिवृष्टीने झालेले नुकसान मोठे असून संकटात सापडलेल्या शेतकर्‍याला मदत करण्यासाठी सरकारला भाग पाडू, असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.

मंगळवारी फडणवीस यांनी उस्मानाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. नुकसान होवून आठ दिवस झाले तरी प्रशासन पोहोचले नाही, अशी अवस्था अनेक ठिकाणी आहे. जमीन मोठ्या प्रमाणात खरडली गेली आहे. त्यामुळे पुढचे पीक घेणे अशक्य आहे. आमच्या काळात यासाठी वेगळी मदत देण्यात आली होती, असेही फडणवीस यांनी सांगितले. १ ते १४ ऑक्टोबर या काळात मोठा पाऊस झाला. या पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणीला आलेली पिके आणि कापलेली पिके दोन्हींचे मोठे नुकसान या पावसाने झाले असल्याने सरकारने तत्काळ पंचनामे संपवून, अगदी मोबाईल फोटो ग्राह्य धरून लगेच मदत दिली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली.

- Advertisement -

यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारी सोलापुरात शेतकर्‍यांना केलेल्या मदतीवर भाष्य केले. काल जसे ३८०० रुपयांचे धनादेश दिले, तशी थट्टा पुन्हा शेतकर्‍यांची करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. जी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी घेतली होती, त्याची पूर्तता करण्याची संधी आता या सरकारकडे आहे. त्यांनी शेतकर्‍यांना आता त्याचप्रमाणे मदत करावी, असे सांगून फडणवीस यांनी त्या वक्तव्यांचे जुने व्हिडिओ पत्रकारांना दाखविले. ही वेळ राजकारण करायची नाही. अधिक संवेदनशील राहण्याची असून, सतत केंद्र सरकारकडे बोट दाखविणे सुद्धा योग्य नाही. केंद्र सरकार तर मदत देईलच, केंद्र सरकारची प्रक्रिया सर्वांना ठावूक आहे. आधी राज्य सरकारला आपला प्रस्ताव सादर करावा लागेल. पंतप्रधान मोदीजी आधीच्या सरकारपेक्षा निश्चितपणे अधिक मदत करतील. तशी त्यांनी यापूर्वी सुद्धा महाराष्ट्राला केली आहे, असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -