घरताज्या घडामोडीLive Update: देशात २४ तासात ४४,८७८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Live Update: देशात २४ तासात ४४,८७८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Subscribe

आमदार रवी राणा आणि काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नागपूर महामार्ग मोझरी येथे पोलिसांकडून तब्बल दोन तास थांबविण्यात आला होता. मोझरी येथे आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पार्टीकडून शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन सुरु असल्याने अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली होती.


ड्रग्ज प्रकरणी समन्स मिळाल्यानंतर अभिनेता अर्जुन रामपाल चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाला आहे.

- Advertisement -


देशात गेल्या २४ तासात ४४ हजार ८७८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली, त्यामुळे देशातील बाधितांचा आकडा ८७ लाख २८ हजार ७९५ वर पोहोचला आहे. तर ५४७ जणांचा कोरोनाने बळी गेला.

- Advertisement -


भिवंडीतील खोका कंपाऊंड परिसरात यंत्रमाग कारखाना आहे. शुक्रवारी सकाळी अचानक या कारखान्यात आगीचा भडका उडाला. भिवंडी शहरातील खोका कंपाऊंड परिसरामध्ये एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. ही आग लागल्याने कारखान्याच्या आजू-बाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही.


२०१६ पासून धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दरवर्षी ‘आयुर्वेद दिवस’ साजरा केला जातो. यंदा पाचवा आयुर्वेद दिवस आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी गुजरातच्या जामनगरमधील भारतीय आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन (आयटीआरए) आणि राजस्थानमधील जयपूरची राष्ट्रीय आयुर्वेद संस्था आज देशाला समर्पित केल्या जातील. आयुष मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.


साखरसम्राट रत्नाकर गुट्टे यांचा मुलगा सुनील गुट्टे याला अटक करण्यात आली आहे. कागदपत्रांची हेराफेरी करून घोटाळा केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.


राज्यात ४,४९६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७,३६,३२९ झाली आहे. राज्यात ८४,६२७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात १२२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४५,६८२ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.


देशभरात सलग पाचव्या दिवशी नवीन रुग्णाची संख्या ५० हजारांच्या आत राहिली आहे. २४ तासात ४७,९०५ नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्ण बरे होण्याची दैनंदिन संख्या नव्या रुग्णांपेक्षा जास्त असण्याचा कल ४० व्या दिवशीही कायम आहे. २४ तासात ५२,७१८ रुग्ण बरे झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -