घरअर्थजगतकारवरही बँका देतात कर्ज...

कारवरही बँका देतात कर्ज…

Subscribe

आपत्कालीन काळात असा घेऊ शकता फायदा

कोरोना संकटाच्या काळात लोकांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. अनेक लोकांचे पगार कापले जात आहेत, तर बर्‍याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या संकटाच्या वेळी लोकांना अचानक पैशांची गरज भासल्यास मित्र किंवा नातेवाईकांकडून मदत घेतली जात आहे. परंतु दोघांनी नकार दिला तर बँकेकडून कर्ज घेत आहेत. मात्र, बँकांकडून घेतलेलं कर्जावर मोठ्या प्रमाणात व्याज द्यावं लागत आहे.

तथापि, परवडणारी कर्जे घेण्याचे बरेच मार्ग आहेत ज्याविषयी ग्राहकांना माहिती नाही आहे. आपली कार सुरक्षिततेवर ठेवून कर्ज घेणे, हा देखील एक मार्ग आहे. बँकिंग भाषेत याला ‘लोन अगेन्स्ट कार’ असं म्हणतात. म्हणजेच, आपण आपल्या कारवर कर्ज देखील घेऊ शकता, याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत मोठी मदत मिळू शकेल. विशेष म्हणजे या प्रकारचे कर्ज स्वस्त असतं. हे कर्ज सहसा १८ ते ६० महिन्यांसाठी मिळतं.

- Advertisement -

असा करू शकता अर्ज

जवळजवळ प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना ही ऑफर देते. तुम्हाला ज्या बँकेतून कारवर कर्जासाठी अर्ज करायचा असेल, त्या संकेतस्थळावर जा आणि कर्जाचा अर्ज भरुन सादर करा. यानंतर आपल्याला आपल्या कारशी संबंधित काही माहिती सामायिक करावी लागेल. त्यात कोणत्या कंपनीची कार आहे. गाडीचं मॉडेल वर्ष कोणतं आहे आणि मॉडेल काय आहे इत्यादी माहिती द्यावी लागेल. यानंतर, आपल्याकडे आवश्यक कागदपत्रे मागितली जातील. यामध्ये बँकेचा तपशील, मागील २-३ वर्षांच्या प्राप्तिकर रिटर्नची प्रत आणि बँक स्टेटमेंट, पत्ता इत्यादीची कागदपत्रे मागीतली जातात. केवायसीला आधार द्यावा लागेल. यानंतर आपल्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जातील.


हेही वाचा – अमेरिकेचाही चीनी कंपन्यांवर डिजिटल स्ट्राईक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -