आली लहर केला कहर! गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी त्याने तोडला लॉकडाऊन आणि…

जोनाथला २८ मार्चला १४ दिवसांसाठी पर्थमध्ये विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले. जर तो हॉटेलमध्ये राहला असता तर सोमवारी त्याला सोडून देण्यात आलं असतं

प्रातिनीधीक

जगात कोरोनाचा वाढता फैलाव बघता अनेक देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. भारतात ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. त्याचप्रमाणे अनेक देशात लॉकडाऊन आहे. भारतात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून अनेकांनी तो नियम मोडला पण ऑस्ट्रेलियामध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून तो तोडल्याची पहिलीच घटना समोर आली आहे. ३५ वर्षीय मुलाने आपल्या गर्लफ्रेंडसाठी हा नियम तोडला आहे. जोनाथन डेविड असं या तरूणाचं नाव आहे. या तरूणाला १ महिन्याची शिक्षा सुनावली आहे.

३५ वर्षीय जोनाथन याला लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. त्याला पर्थ हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र तो तिथून पळाला. जोनाथन पळाला हे सीसीटिव्हीत कैद झाल्यामुळे पोलिसांना त्याला अटक केली. त्याला पळण्याचे कारण विचारताच तो म्हणाला, ‘मला माझ्या गर्लफ्रेंडची खूप आठवण आली म्हणून मी पळालो’ अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस म्हणाले, पळून जाताना जोनाथने हॉटेल कर्मचाऱ्यांना चकमा दिला. मात्र तो सीसीटिव्हीत कैद झाल्यामुळे त्याला पकडणं शक्य झालं. जोनाथला २८ मार्चला १४ दिवसांसाठी पर्थमध्ये विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले. जर तो हॉटेलमध्ये राहला असता तर सोमवारी त्याला सोडून देण्यात आलं असतं. पण आता त्याला १ महिन्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. त्याचबरोबर त्याला दोन हजार ऑस्ट्रेलियन डॉलरही शिक्षाम्हणून द्यावे लागणार आहेत.


हे ही वाचा – दारूच्या अट्टाहासापायी त्याने गमावला जीव!