घरदेश-विदेशLok Sabha 2024 : राजस्थानमध्ये भाजपाची साथ सोडून खासदार काँग्रेसमध्ये, तिकीट कापताच...

Lok Sabha 2024 : राजस्थानमध्ये भाजपाची साथ सोडून खासदार काँग्रेसमध्ये, तिकीट कापताच निर्णय

Subscribe

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने यादी जाहीर केल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. काल, रविवारी चंदिगडमधील खासदार ब्रिजेंद्र सिंग यांनी भाजपाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर, आज, सोमवारी राजस्थानमधील भाजपा खासदार राहुल कासवान यांनी देखील पक्षाला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर दोनच दिवसांत त्यांनी आपली नाराजी जाहीर करत, काँग्रेस प्रवेशाचे संकेत दिले होते.

हेही वाचा – Nilesh Lanke : राजकारण क्षणाक्षणाला बदलत असतं, शरद पवारांच्या पक्षात जाण्याबाबत संदिग्धता

- Advertisement -

भाजपाने जाहीर केलेल्या 195 उमेदवारांच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे पक्षाने आपण्यात आली आहे. यापैकी काही जणांनी राजकारणालाच रामराम केला असून काहींनी पक्षनेतृत्वाचा हा निर्णय मान्य केला आहे. राजस्थानमधील चुरू येथील खासदार राहुल कासवान यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे.

- Advertisement -

माझ्या चुरू लोकसभा परिवाराला राम-राम. माझ्या कुटुंबातील सदस्यांनो, तुमच्या भावनांना अनुसरून मी सार्वजनिक जीवनातील मोठा निर्णय घेत आहे. राजकीय कारणांमुळे मी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि खासदारकीचा राजीनामा देत आहे, असे ट्वीट करत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थित झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा, प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंग रंधवा, विरोधी पक्षनेते टिकाराम जुली हेही उपस्थित होते.

हेही वाचा – Pankaja Munde : पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता…; मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

पहिल्या यादीत भाजपाने राजस्थानमधील 15 जागांसाठी उमेदवार निश्चित केले आहेत. त्यात चुरू लोकसभा जागेचाही समावेश आहे. यावेळी पक्षाने विद्यमान खासदार राहुल कासवान यांच्या जागी पद्मभूषण पुरस्कार देवेंद्र झाझरिया यांना तिकीट देण्यात आले आहे. उमेदवारी न मिळाल्याने 47 वर्षीय राहुल कासवान संतप्त झाले होते. उमेदवारी नाकारल्यानंतर राहुल कासवान यांनी सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि या प्रश्नांची उत्तरे कोणीही देत नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

चंदीगडच्या हिसारमधील भाजपा खासदार ब्रिजेंद्र सिंग यांनी काल, रविवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दिल्लीमध्ये त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत काँग्रसमध्ये प्रवेश केला. या लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळण्याची खात्री ब्रिजेंद्र सिंग यांना नाही. 2019मध्ये त्यांनी जेजेपीचे दुष्यंत चौटाला यांचा पराभव केला होता. जेजेपी सध्या भाजपसोबत युतीमध्ये आहे. ही युती तोडली नाही, तर पक्ष सोडण्याचा इशारा सिंग यांनी यापूर्वीच पक्षाला दिला होता. तसेच कुलदीप बिश्नोई भाजपामध्ये आल्याने त्यांना तिकीट न मिळणे जवळपास नक्की होते. यामुळेच त्यांनी पक्ष सोडला.

हेही वाचा – Pragya Singh Thakur : साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी NIA चे वॉरंट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -