घरदेश-विदेशLok Sabha 2024 : यंदाही 'मोदी का परिवार'ची जादू चालणार का? भाजपाचे...

Lok Sabha 2024 : यंदाही ‘मोदी का परिवार’ची जादू चालणार का? भाजपाचे विरोधकांना प्रत्युत्तर

Subscribe

नवी दिल्ली : येत्या आठ ते दहा दिवसांत लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना भाजपाने सोशल मीडियावर ‘मोदी का परिवार’ नावाने मोहीम सुरू केली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने ‘मैं भी चौकीदार’ नावाचे अभियान चालविले होते. निकाल आल्यावर त्याचा प्रभाव लक्षात आला. 2014च्या तुलनेत 2019मध्ये भाजपाने मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.

हेही वाचा – Yogesh Kadam: … तर मला नाइलाजाने वेगळं पाऊल उचलावं लागेल; योगेश कदमांचा भाजपाला इशारा

- Advertisement -

विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाने रविवारी बिहारमध्ये मेगारॅली काढली होती. याच रॅलीत राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या टीकेवरून वाद निर्माण झाला आहे. आता भाजपाने याच मुद्द्यावरून सोशल मीडियावर ‘मोदी का परिवार’ नावाचे अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या प्रोफाइलसमोर ‘मोदी का परिवार’ असे लिहित आहेत.

‘मैं भी चौकीदार’ अभियान

सन 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी राफेलचा मुद्दा उचलून धरला होता. काँग्रेसने राफेल लढाऊ विमान सौद्यात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता आणि याच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 2019मध्ये न्यायालयाने या याचिकांवर आपला निर्णय राखून ठेवला होता, परंतु राफेल लढाऊ कराराशी संबंधित संरक्षण मंत्रालयाची काही अंतर्गत कागदपत्रे मीडियावर लीक झाली होती. यानंतर काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी नैतिक विजयाचा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोरी केल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याचे सांगितले. राहुल गांधी यांनी अमेठीतील सभेनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले होते, ‘सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की चौकीदाराने चोरी केली आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – Shivsena vs Shivsena : शिंदेंच्या आमदाराची ठाकरेंवर टीका; राजन साळवी म्हणाले, कोण रामदास कदम

राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधी नेत्यांनीही भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार आरोप केले. दुसरीकडे, भाजपाने राफेल वादावर राहुल गांधी यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली आणि ‘मैं भी चौकीदार’ हे अभियान राबविले. अनेक भाजपा नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर ‘मैं भी चौकीदार’ असे आपल्या नावापुढे जोडले. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने या घोषवाक्याचा पुरेपूर वापर केला. विशेष म्हणजे, नोव्हेंबर 2019मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमान खरेदीशी संबंधित सर्व याचिका फेटाळल्या होत्या.

‘मैं भी चौकीदार’चा अनुकूल परिणाम

लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे 2019 रोजी जाहीर झाले तेव्हा भाजपाने दणदणीत विजय नोंदवला. 2019मध्ये भाजपाने 543पैकी 436 जागांवर उमेदवार उभे केले होते. पक्षाने उर्वरित जागा मित्रपक्षांना दिल्या होत्या. भाजपाला 303 जागांवर विजय मिळाला. 2014च्या तुलनेत या जागा जास्त होत्या. तर काँग्रेसला केवळ 52 जागा मिळाल्या होत्या. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 351 जागा मिळाल्या तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीला (UPA) 90 जागा मिळाल्या. 30 मे 2019 रोजी नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

आता लक्ष येत्या लोकसभा निवडणुकीकडे

या निवडणुकीत ‘मोदी का परिवार’ चर्चेत आहे. पाटणा येथे रविवारी विरोधकांची सभा झाली त्यात लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वैयक्तिक टिप्पणी केली. नरेंद्र मोदी आजकाल परिवारवादावर प्रहार करत आहेत. लोकांना जास्त मुले असण्याबाबत पंतप्रधान म्हणतात की, लोक कुटुंबासाठी लढत आहेत. तुम्हाला तर कुटुंब नाही, अशी टीका करतानाच तुम्ही हिंदूही नाहीत. तुमच्या आईचा मृत्यू झाला तेव्हा, तुम्ही केस आणि दाढी तसेच ठेवली होती, असे त्यांनी म्हटले होते. याच अनुषंगाने आता ‘मोदी का परिवार’ हे अभियान भाजपाने चालविले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -