घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : कुऱ्हाडीने EVM फोडल्याप्रकरणी तरुणाला अटक; नांदेडमधील धक्कादायक प्रकार

Lok Sabha 2024 : कुऱ्हाडीने EVM फोडल्याप्रकरणी तरुणाला अटक; नांदेडमधील धक्कादायक प्रकार

Subscribe

नांदेडच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रावर तरुणाने ईव्हीएम फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नांदेड : अटीतटीच्या लढतींमुळे चर्चेत असलेल्या राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघासह देशातील 89 लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र नांदेडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला गालबोट लागलं आहे. बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रावर तरुणाने ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनची कुऱ्हाडीने फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर मतदान केंद्रावर काही काळ तठणावाचे वातावरण होते. सध्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास करत आहेत. (Lok Sabha Election 2024 Youth arrested for breaking EVM with ax in Nanded)

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील एका शाळेच्या मतदान केंद्रावर आज दुपारपर्यंत सुरळीत आणि शांततेत मतदान सुरू होतं. मात्र, अचानक एक तरुण मतदान केंद्रात घुसला आणि त्याने छोट्या कुऱ्हाडीने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन फोडण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने मतदान केंद्रावरील अधिकारी आणि मतदानासाठी रांगेत असलेले नागरिकही भयभीत झाले. अधिकाऱ्यांनी तरुणाला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र संतापलेला तरुण मशीनवर वारंवार प्रहार करत होता. तरुणाने दोन मशीनची तोडफोड केली. यावेळी मतदान केंद्राबाहेर असलेल्या पोलिसांनी आतमध्ये धाव घेतली आणि तरुणाला अटक केली. मात्र भयभयीत झालेल्या मतदारांनी केंद्रावरून पळ काढला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : ऐन निवडणुकीत ठाण्यात सापडले ईव्हीएम अन् हजारो मतदान कार्ड, आव्हाडांकडून संताप

भय्यासाहेब एडके असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. संविधान वाचवण्यासाठी आपण हे करत असल्याचं संबंधित तरुण ओरडत असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच तरुणाने कुऱ्हाड लपवून आणली होती असं सांगितलं जातं. पण तरुणाने मशीन का फोडल्या? या मागे कुणाचा हात आहे का? तरुण कुठल्या पक्षाशी संबंधित आहे का? तो राहतो कुठे? काय करतो? याची माहिती पोलीस घेत आहेत. पोलिसांनी सबंधित तरुणला अटक केलेली आहे. योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तसेच मशीन बदलण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

- Advertisement -

मतदानाला कोणताही धोका नाही

दरम्यान तरुणाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट फोडले असले तरी कंट्रोल युनिट सुरक्षित आहे. त्यामुळे सकाळपासून झालेल्या मतदानाला कोणताही धोका नाही. प्रशासनाने तत्काळ ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन बदलले असून मतदान प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली, अशी माहिती नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली आहे.

हेही वाचा – Politics : …म्हणून मोदी, फडणवीस, अमित शहा छातीचा फुगा फुगवून चालतात; ठाकरे गटाचा घणाघात

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -