घरदेश-विदेशLok Sabha 2024 : देशात पहिले कमळ फुलले, सुरतमध्ये भाजपाच्या मुकेश दलालांची...

Lok Sabha 2024 : देशात पहिले कमळ फुलले, सुरतमध्ये भाजपाच्या मुकेश दलालांची बिनविरोध निवड

Subscribe

एक दिवसापूर्वी काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला होता. सुरतमधील पक्षाचे पर्यायी उमेदवार सुरेश पडसाळ यांचाही उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. यानंतर इतर सर्व उमेदवारांनी आपली नावे मागे घेत मुकेश दलाल यांचा विजय निश्चित केला.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा पहिलाच टप्पा पार पडला आहे. या निवडणुकीचे एकूण सात टप्पे असून 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. पण त्यापूर्वीच गुजरात आणि देशात पहिले कमळ फुलले आहे. गुजरातच्या सुरतमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरला तर, उर्वरित आठ उमेदवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नाला पाठिंबा देत अर्ज मागे घेतले. त्यामुळे सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले. निवडणूक आयोगाकडून याची अधिकृतपणे घोषणा केली जाईल. (Lok Sabha Election 2024: BJP’s Mukesh Dalal elected unopposed in Surat)

एक दिवसापूर्वी काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला होता. सुरतमधील पक्षाचे पर्यायी उमेदवार सुरेश पडसाळ यांचाही उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. यानंतर इतर सर्व उमेदवारांनी आपली नावे मागे घेत मुकेश दलाल यांचा विजय निश्चित केला. सर्वात शेवटी बसपाचे उमेदवार प्यारेलाल भारती यांनी अर्ज मागे घेतला.

- Advertisement -

मुकेश दलाल हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांचे निकटवर्ती आणि विश्वासू मानले जातात. गुजरातच्या सुरत लोकसभा मतदारसंघातून सोमवारी सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले, त्यानंतर भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. मुकेश दलाल हे सुरतच्या इतिहासातील बिनविरोध निवडून आलेले पहिले खासदार ठरले आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी या विजयाबद्दल मुकेश दलाल यांचे अभिनंदन केले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही ट्विटररून मुकेश दलाल यांचे अभिनंदन केले. आता गुजरातमधील 25 जागांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज बाद ठरवल्याबद्दल काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेणार आहे.

- Advertisement -

सुरत लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज भाजपाच्या सांगण्यावरून फेटाळण्यात आल्याचा आरोप गुजरातचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शक्तीसिंह गोहिल यांनी केला. ही लोकशाहीची हत्या आहे. या आदेशाविरुद्ध (रिटर्निंग ऑफिसरच्या) आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू आणि गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयातही जाऊ, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : कितीही येऊदेत अडथळे आता माघार नाही…; महाविकास आघाडी-भाजपला आव्हान देणारे विशाल पाटील कोण?


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -