घरक्राइमLok Sabha Election 2024 : चेन्नई स्थानकावर मिळाली चार कोटींची रोख रक्कम;...

Lok Sabha Election 2024 : चेन्नई स्थानकावर मिळाली चार कोटींची रोख रक्कम; संशयित भाजपा कार्यकर्ता ताब्यात

Subscribe

Lok Sabha elections 2024 : चेन्नई रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री तिघांकडे चार कोटींची रोख रक्कम सापडली आहे. या प्रकरणी तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. यात एका भाजपा कार्यकर्त्याचा समावेश असल्याची माहिती असून चौकशी दरम्यान त्याने भाजपा उमेदवाराचे नाव घेतले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

चेन्नई : लोकसभा निवडणुकीचा काळ आहे. देशभरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्कतेचे वातावरण आहे. अशातच चेन्नई रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री तिघांकडे चार कोटींची रोख रक्कम सापडली आहे. या प्रकरणी तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. यात एका भाजपा कार्यकर्त्याचा समावेश असल्याची माहिती असून चौकशी दरम्यान त्याने भाजपा उमेदवाराचे नाव घेतले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Lok Sabha election 2024 Four Crore cash seized at Chennai station; Suspected BJP worker arrested)

लोकसभा निवडणुकीपूर्वी चेन्नई येथील तांबरम रेल्वे स्थानकावर चार कोटींच्या रोख रकमेसह तिघांना अटक करण्यात आली. यात एका भाजपा कार्यकर्त्याचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघे चार बॅगांमधून हे पैसे घेऊन जात होते. हे तिघेही ट्रेनने तिरुनेलवेली येथे जाणार होते, तेव्हाच भरारी पथकाने त्यांना ताब्यात घेतले. प्राप्तिकर विभाग आता या प्रकरणाची चौकशी करत आहे.

- Advertisement -

ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी सतीश हा भाजपा कार्यकर्ता आणि एका हॉटेलचा व्यवस्थापक आहे. त्याचा भाऊ नवीन आणि ड्रायव्हर पेरुमल हे तिघे पैसे घेऊन जात होते. तिरुनेलवेलीचे भाजपा उमेदवार नैनार नागेंतीरन यांच्या सूचनेवरून हे पैसे घेऊन जात असल्याचे सतीशने मान्य केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीनंतरच खरे काय ते कळेल. दरम्यान, या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे भाजपा उमेदवार नैनार नागेंतीरन यांनी स्पष्ट केले आहे. (Lok Sabha election 2024 Four Crore cash seized at Chennai station; Suspected BJP worker arrested)

चेंगलपट्टूच्या विभागीय निवडणूक आयुक्तांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. चार कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास प्राप्तिकर विभागाकडे सोपवण्यात आला आहे. आचारसंहितेच्या नियमांनुसार, 10 लाखांपेक्षा अधिक रक्कम सापडल्यास त्याची चौकशी करणे आवश्यक असते. त्याप्रमाणे या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम नेली जाणार आहे, अशी माहिती तामिळनाडू भरारी पथकाला मिळाली होती, त्यानुसार रात्री नऊ वाजता रेल्वे स्टेशनवर तपासास सुरुवात करण्यात आली, आणि ही रक्कम सापडली.

- Advertisement -

तामिळनाडूत 19 एप्रिलला पहिल्याच टप्प्यात सगळ्याच्या सगळ्या 39 जागांवर मतदान होणार आहे. त्यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम मिळणे, ही गंभीर बाब मानली जात आहे. (Lok Sabha election 2024 Four Crore cash seized at Chennai station; Suspected BJP worker arrested)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -