घरक्राइमवाहनाच्या धडकेत सेवानिवृत्त पोलिसाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत सेवानिवृत्त पोलिसाचा मृत्यू

Subscribe

नवीन नाशिकमधील घटना

कामाठवाडे परिसरात रविवारी (दि.७) सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास दुचाकी व चारचाकी वाहनाचा अपघात झाला. या अपघातात सेवानिवृत्त पोलीस साहेबराव सोनू सांगळे (वय 59) यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहेबराव सोनू सांगळे हे आपल्या घरातून कामटवाडे परिसरातून जात होते. त्यावेळी चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ पुतण्या संकेत सांगळेने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. साहेबराव सांगळे यांनी डोक्यात हेल्मेट परिधान केले होते. त्यांच्या पश्यात बायको, मुलगी, जावई आणि नातू असा परिवार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -