घरदेश-विदेशLow Bone Density मुळे महिलांमध्ये वाढतोय बहिरेपणाचा धोका !

Low Bone Density मुळे महिलांमध्ये वाढतोय बहिरेपणाचा धोका !

Subscribe

महिलांना त्यांच्या वाढत्या वयाबरोबर कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता शक्यतो भासताना दिसतेय. यामुळे महिलांना कित्येक आजारांना सामोरे जावे लागते. दरम्यान, ऑस्टिओपोरोसिस किंवा लो बोन डेन्सिटीमुळे महिलांना ऐकण्याची म्हणजेच बहिरेपणाची समस्या उद्भवू शकते, असा दावा हार्वर्ड मेडिकल स्कूलचे ब्रिघॅम अँड वुमन हॉस्पिटल (बीडब्ल्यूएच) च्या संशोधनात करण्यात आला आहे. ब्रिघॅम आणि महिला रुग्णालयातील संशोधकांनी साधारण १ लाख ४४ हजारांहून अधिक महिलांवर हे संशोधन करून हे सिद्ध केले आहे.

महिलांना बहिरेपणाची समस्या उद्भवणे ही अमेरिकेतील तिसरी सर्वात मोठी समस्या असल्याचे अमेरिकन जेरियाट्रिक सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनात म्हटले आहे. ऐकू कमी येत असलेल्या लोकांच्या मागील अभ्यासानुसार असे स्पष्ट झाले की, महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचे मोठे प्रमाण दिसून आले आहे, ज्यामध्ये हाडे ठिसूळ होण्याच्या समस्या सर्वाधिक निर्माण होत आहेत. करण्यात आलेल्या नव्या संशोधनात असे सूचित करण्यात आले आहे की, ऑस्टियोपोरोसिस आणि लो बोन डेन्सिटी असलेल्या महिलांना श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका असतो. ब्रिघममधील नेटवर्क मेडिसिनच्या चॅनिंग विभागातील संशोधकांनी असे सांगितले की, करण्यात आलेल्या संशोधनात असे आढळून आले की, बिस्फोफोनेट्स उंदीरांमधील ध्वनी-प्रेरित हियरिंग लॉस टाळण्यास मदत करू शकतात.

- Advertisement -

या संशोधनात संशोधकांनी हियरिंग लॉसची तपासणी करतांना ज्यांना जास्त गंभीर धोका होता. त्यांचा अभ्यास केला. याव्यतिरिक्त, सहभागींच्या ऑडिओमेट्रिक थ्रेशोल्डवरील डेटा समाविष्ट करण्यासाठी त्यांनी CEARS Audiometry Assessment Arm चा वापर केला. ऑस्टियोपोरोसिस किंवा LBD ग्रस्त व्यक्तींना हियरिंग लॉस होण्याचा धोका जास्त असतो, असे एनएचएस आणि एनएचएस II या दोन्ही गटांमधील संशोधकांना संशोधन करताना आढळून आले.

 

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -