घरदेश-विदेशबाप कर्मचारी बेटा अधिकारी

बाप कर्मचारी बेटा अधिकारी

Subscribe

पोलिस अधिक्षक झालेल्या मुलाच्या हाताखाली आता वडीलांना काम करावं लागणार आहे. लखनऊमध्ये हा अनोखा योगायोग जुळून आला आहे.

‘बाप से बेटा सवाई’ ही म्हण तुम्हा सर्वांना माहित आहे. याच म्हणीची प्रचिती आली ती लखनऊमध्ये. पोलिस अधिक्षक अनुप सिंग यांची गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला ‘बाप से बेटा सवाई’ म्हणजे काय ते नक्की कळेल. अनुप सिंह यांनी लखनऊ शहराच्या उत्तर विभागाच्या पोलिस अधिक्षकाचा पदभार स्वीकारला. पण या ठिकाणचा योगायोग असा की, अनुप सिंग यांचे वडील जितेंद्र सिंग देखील लखनऊमध्येच कामाला आहेत. पण, जितेंद्र सिंग यांना आता अनुप सिंग यांच्या आदेशानुसार काम करावं लागणार आहे. कारण अनुप सिंग हे पोलिस अधिक्षक असणार आहेत तर, जितेंद्र सिंग हे विभूती खाड पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. पण त्याचं पद हे अनुप सिंग यांच्यापेक्षा मोठं नाही. ही गोष्ट लक्षणीय आहे.

आनंदाश्रू

अनुप सिंग यांनी पोलिस अधिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जितेंद्र सिंग यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. यावेळी बोलताना जितेंद्र सिंग यांनी सांगितले की, आजचा दिवस हा माझ्यासाठी आनंदाजा आहे. मला माझ्या मुलाचा अभिमान वाटतोय. त्याच्या हाताखाली काम करणं हे माझं सदभाग्य आहे. नियमानुसार मी अनुपला सॅल्युट देखील करणार. आज मला किती आनंद झाला आहे हे मी सांगू शकत नाही. पण एकत्र काम करताना आमचं बाप – लेकाचं नातं आड येणार नाही याची देखील आम्ही काळजी घेऊ. कर्तव्याला आम्ही सर्वप्रथम प्राधान्य देऊ. तर अनुप सिंग यांनी देखील हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असून, एकत्र काम करायला नक्कीच मजा येईल. पण, कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या नात्याचा आमच्या कामावर परिणाम होणार नाही. अशी प्रतिक्रिया दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -