घरमहाराष्ट्रनगरमध्ये रिव्हॉल्वरचा धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटले

नगरमध्ये रिव्हॉल्वरचा धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटले

Subscribe

अहमदनगरमध्ये एका व्यापाऱ्याला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

रिव्हॉल्वरचा धाक दाखवून एका व्यापाऱ्याल लुटल्याची धक्कादायक घटना अहमदनगर येथे घडली आहे. ही घटना पहिल्यांदाच घडली नसल्याने शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सातत्याने घडत असलेल्या घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. एका अज्ञात चोरट्यांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून व्यापाऱ्याकडून पाच लाख लुटून पोबारा केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.

नेमके काय घडले?

अहमदनगर येथे राहणारे बलराम बन्सीलाल आहुजा (४०) हे व्यापारी आपले दुकान बंद करुन घरी निघाले होते. घरी जात असताना त्यांनी आपल्या पिशवीत पाच लाख रुपयांची रोकड पिशवीत ठेऊन ती पिशवी मोटारसायकलच्या हँडला अडकवली. त्याच दरम्यान त्यांच्या मागावर असलेल्या चोरट्यांनी त्यांना रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास अडवले. या मोटारसायकल वरुन येणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी रिव्हॉल्वर काढून त्यांच्या डोक्यावर लावून व्यापारी बलराम आहुजा यांच्याकडे पिशवीची मागणी केली. व्यापारी पैसे देत नसल्याचे पाहून त्यांनी त्यांच्याकडील पिशवी हिसकावून तेथून पळ काढला. त्यांच्या मोटारसायला प्लेट नसल्याने त्यांच्या गाडीचा नंबर देखील कळू शकला नाही. अखेर बलराम आहुजा यांनी पोलिसात धाव घेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक नामदेव सहारे अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

वाचा : मोलकरणीनेच लुटले १४ लाख रुपये

वाचा : कास्टिंग डायरेक्टर असल्याचे सांगून २५ लाखांना लुटले

- Advertisement -

वाचा : भरदिवसा सोन्याच्या व्यापाऱ्याला लुटले; ३७ लाखांचे दागिने लंपास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -