घरदेश-विदेशKalicharan Maharaj : महात्मा गांधींविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजाला अटक

Kalicharan Maharaj : महात्मा गांधींविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजाला अटक

Subscribe

महात्मा गांधींविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजला अखेर अटक करण्यात आली आहे. कालीचरण महाराजाविरोधात छत्तीसगड, महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर आज पहाटे ४ वाजता मध्य प्रदेशमधील खजुराहो बगेश्वरी धाम येथून त्याला अटक करण्यात आली आहे. छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. छत्तीसगडची राजधानी राजपूरमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराजाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर ही कारवाई करण्यात आहे.

- Advertisement -

रायपूर येथील धर्मसभेत रविवारी कालीचरण महाराजाने महात्मा गांधीजींना शिवीगाळ करत अपशब्द वापरले होते. याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेपासून देशभरात उमटले. राजकीय सामाजिक याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. असा असतानाही कालीचरण महाराजाने आपली वादग्रस्त विधाने सुरुचं ठेवली. व्हिडिओच्या माध्यमातून त्याने पुन्हा एकदा महात्मा गांधींविरोधात बरळ ओकली. त्यामुळे छत्तीसगड पोलीस मागील काही दिवसांपासून कालीचरण महाराजाच्या मागेवर होते. अखेर खजुरोही येथील बागेश्वर धाम येथील घरातून कालीचरण महाराजाला बेड्या ठोकल्या आहेत.


महात्मा गांधींना शिवीगाळ केल्याचा पश्चाताप नाही, कालीचरण महाराजांनी केला नवा वादग्रस्त व्हिडीओ शेअर


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -