घरदेश-विदेशकोलकात्यातील माजेरहाट पूल कोसळला

कोलकात्यातील माजेरहाट पूल कोसळला

Subscribe

कोलकात्यामध्ये वाहतूकीचा पुल कोसळल्याची घटना घडली आहे. तारातला परिसरामध्ये माजेरहाट पूलाचा काही भाग कोसळला असून पुलाखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. या दुर्घटनेमध्ये अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुल दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. मुसळधार पावसामुळे पुलाचा काही भाग कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

बचावकार्य सुरु

६० वर्ष जूना असलेल्या या पुलाच्या दुरुस्तीचे काम देखील सुरु होती. पुलाच्या खाली रेल्वे लाईन, दुकान आणि घरे असल्याची माहिती समोर येत आहे. मंगळवारी दुपारी अचानक पुलाचा काही भाग कोसळला.अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्याचे काम सरु आहे.

- Advertisement -

पुलाच्या शेजारी बांधकाम सुरु होते

या पुलाच्या शेजारी बांधकामाचे काम सुरु होते. हा पुल बेहाना- इकबाल या दोन भागांना जोडला जातो. पुल जेव्हा पडला त्यावेळी या पुलावरुन वाहतूक करणाऱ्या गाड्या ढिगाऱ्याखाली अडकल्या आहेत. बचावकार्यात अडथळा येऊ नये यासाठी या भागामध्ये येणाऱ्या मार्गावरील वाहतूक थांबवणयात आली आहे.

लोकांमध्ये भितीचे वातावरण 

ज्यावेळी पुलाचा काही भाग कोसळला त्यावेळी पूलाच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना मोठा आवज आला. घाबरलेले सर्व ेनागरिक घराबाहेर पडले. पूल पडल्यानंतर पुला शेजारील लोकवस्तीमधील वीज पुरवठा ठप्प झाला.

याप्रकरणाची चौकशी होणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पूल दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचे सांगितले आहे. अग्निशमन दल, पोलीस, एनडीआरएफची टीम बचावकार्य करत आहेत. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहे. आता आमचा मुख्य उद्देश बचावकार्य असल्याचे सांगितले आहे.

२०१६ मध्ये घडली होती अशीच घटना

२०१६ मध्ये निर्माणाधीन विवेकानंद पूलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेमध्ये २५ लोकांचा मृत्यू झाला होता. तर ८० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणामध्ये कारवाई करत राज्य सरकारने २ इंजिनिअरला सस्पेंड केले होतो. या दुर्घटनेनंतर केंद्र सराकरने देशभरातील सर्व पुलांचा रिपोर्ट मागितला होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -