घरदेश-विदेश१० जनपथवरच्या चर्चेमध्ये काय खलबतं झाली?

१० जनपथवरच्या चर्चेमध्ये काय खलबतं झाली?

Subscribe

लोकसभा २०१९च्या निवडणुकीसाठी विरोधकांनी भाजपविरोधात कंबर कसली आहे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची दिल्लीच्या निवास्थानी भेट घेत चर्चा केली.

२०१९च्या लोकसभा निवडणुसाठी आता सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसली आहे. भाजपविरोधात सर्व विरोधक आक्रमक झाले असून त्यासाठी आता भेटी-गाठी देखील वाढल्या आहे. तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १० जनपथ या ठिकाणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना ममता बॅनर्जी यांनी भाजपा जोरदार हल्ला चढवला. भाजपच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मी काही त्यांची नोकर नाही असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. आसाममधील ४० लाख लोकांच्या नागरिकत्वाच्या मुद्यावरून ममता बॅनर्जी यांनी भाजपला लक्ष्य केले. आसाममध्ये भाजपने राजकीय खेळी खेळली असून निवडणुकीमध्ये त्याचा फायदा भाजपला होणार असा आरोप ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केला आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्तेवर येणार नाही हे लक्षात आल्याने भाजप आता सैरभैर झाली आहे असे देखील ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

विरोधकांच्या एकीची गरज

२०१९च्या दृष्टीने विचार करता भाजपला सध्या निराशेमध्ये आहे. कारण त्यांना सत्तेत येणार नाही याची खात्री आहे. आम्ही भाजपच्या अरे ला कारे ने अजिबात उत्तर देणार नाहीत. भाजपला सत्तेपासून दूर करणे हीच आमची प्राथमिकता आहे. आम्ही विरोधक एकत्रितरित्या लढणार आहोत. जो पक्ष ज्या भागात मोठा असेल त्याला महत्त्व दिले जाईल. त्या भागामध्ये त्याच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील. आम्ही पश्चिम बंगालमध्ये शक्तिमान आहोत. तर, पश्चिम बंगालमध्ये आमच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जातील. शिवाय आम्ही स्वबळावर देखील निवडणुका लढवू शकतो. पण भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांची एकीची गरज आहे. दरम्यान, पंतप्रधानपदाच्या स्पर्धेमध्ये मी केव्हाच नव्हते असे स्पष्टीकरण देखील यावेळी ममता बॅनर्जी यांनी दिले.

- Advertisement -

लालकृष्ण अडवाणींची भेट

दिल्लीमध्ये आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची देखील भेट घेतली. त्यामुळे दिल्लीतील राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा रंगली आहे. यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. भेटी दरम्यान ममता बॅनर्जी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना १९ जानेवारी रोजी कोलकातामध्ये निघणाऱ्या रॅलीचे देखील आमंत्रण दिले. यावेळी ममता बॅनर्जी यांनी विरोधकांच्या एकजुटीचा पु्न्हा एकदा पुर्नरूच्चार केलाय.

EVMवरून सरकारला लक्ष्य

यावेळी ममता बॅनर्जी यांनी EVMवर देखील अविश्वास दाखवला. EVMविरोधात सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाकडे त्याच्याविरोधात तक्रार केली पाहिजे. शिवाय, आगामी निवडणुका या EVMच्या साहाय्याने न घेता बॅलेट पेपरवर घेण्यासाठी सर्व पक्षीयांनी आक्रमक होण्याची गरज ममता बॅनर्जी यांनी बोलून दाखवली. तसेच तृणमुल काँग्रेसचे एक शिष्टमंडळ आसामला भेट देणार असल्याची माहिती देखील ममता बॅनर्जी यांनी दिली.

- Advertisement -

एकंदरीत ममता बॅनर्जींचा आक्रमक पवित्रा पाहता लोकसभा २०१९च्या निवडणुकीमध्ये भाजपविरोधात ममता बॅनर्जींची तोफ धडाडणार हे नक्की!

वाचा – ‘ममता बॅनर्जी मला अटक करू शकतात’

वाचा – आसाम – ४० लाख लोकांनी गमावले भारतीय नागरिकत्व

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -