घरदेश-विदेशबापरे ! देशात ७७% रोजगार असुरक्षित श्रेणीत

बापरे ! देशात ७७% रोजगार असुरक्षित श्रेणीत

Subscribe

भारतात बेरोजगारीची समस्या आजही कायम असल्याचं अनेक अहवालांमधून समोर आलं आहे. देशातला तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर बेरोजगार असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आंतराष्ट्रीय श्रम संघटने म्हणजेच आयएलओने एक चिंताजनक अंदाज वर्तावला आहे. आयएलओच्या अंदाजानुसार देशात २०१८ या वर्षात बेरोजगारीचा दर ५.३ टक्के इतका असणार आहे. चीनमध्येही बेरोजगारीचा दर ०.१ टक्क्यांनी वाढला असून तो  ४.८ टक्क्यांपर्यंत जाईल जाईल, असं आयएलओने त्यांच्या अहवालात म्हटलं आहे. लोकांच्या रोजगाराचा विचार केला तर भारतामध्ये येत्या काळात ७७ टक्के रोजगार असुरक्षित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपल्या देशासाठी ही नक्कीच चिंताजनक बाब ठरणार असस्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या तुलनेत चीनमध्ये मात्र केवळ ३३ टक्के रोजगार असुरक्षित होणार असल्याचं आयएलओचं म्हणणं आहे.

तसं पाहता गेल्या १० ते २० वर्षांमध्ये भारतातील सेवा क्षेत्रांमध्ये रोजगार चांगल्या प्रमाणात वाढला असल्याचं, आयएलओने अहवालात स्पष्ट केलं आहे. मात्र, सरारसरी सर्वच क्षेत्रातील रोजगाराचा विचार करता असंघठित क्षेत्र आणि असुरक्षित रोजगाराचा दबदबा असल्याचंही या अहवलाता नमूद करण्यात आलं आहे.

- Advertisement -

अर्थव्यवस्था सुधारणार ?

तर दुसरीकडे आशिया तसंच प्रशांत क्षेत्रामध्ये आर्थिक विकासाचा वेग ५.५ टक्के इतका असेल, असं आयओलएओने आपल्या अहवालात म्हटलं आहे. ‘द वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आऊटलूक ट्रेंड्स २०१८’ या अहवलाता आयओलएने या बाबींचा उल्लेख केला आहे. याशिवाय दक्षिण आशियातील आर्थिक व्यवहारांना भारतीय अर्थव्यवस्था चालना देत असल्याचं आयएलओने म्हटलं आहे. दरम्यान चालू वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर सुमारे ७.४ टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज आयएलओने वर्तवला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये आपल्या देशाचा विकास ६.७ टक्क्यांनी झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -