घरक्रीडाजागतिक बॅडमिंटन स्पर्धा : दुहेरी सामन्यांसाठी आजचा दिवस निराशाजनक

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : दुहेरी सामन्यांसाठी आजचा दिवस निराशाजनक

Subscribe

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या जोड्यांना आज पराभवाचा सामना करावा लागला आहे.

चीनच्या नानजिंगमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारतीय जोड्याकडून निराशाजनक कामगिरी केली गेली आहे. भारताच्या खेळाडूंना सर्वच दुहेरी सामन्यात आज पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताकडून पुरूष गटात ‘स्वस्तिकराज – चिराग शेट्टी’ आणि ‘मनू अत्री – बी. सुमिथ रेड्डी’ या जोड्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर महिलांमध्ये ‘सिक्की रेड्डी – अश्विनी पोनप्पा’ या भारतीय जोडीला पराभव पत्कारावा लागला आहे.

असे झाले सामने

स्पर्धेच्या पुरूष गटाच्या दुहेरी सामन्यात डेन्मार्कच्या किम अस्ट्रूप आणि अँडर्स रॅसमसन या जोडीने स्वस्तिकराज आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा २१-१८, १५-२१, २१-१६ च्या फरकाने पराभव केला. त्यासोबतच मनू अत्री आणि बी. सुमिथ रेड्डी या भारतीय जोडीला जपानच्या ताकुटो इंक्यू आणि युकी कानेको यांच्याकडून २४-२२, १३-२१, १६-२१ च्या फरकाने पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे महिला गटाच्या दुहेरी सामन्यात सिक्की रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या जोडीला जपानच्या युकी फुकुशिमा आणि सायाका हिरिटोने १४-२१, १५-२१ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.

- Advertisement -

सिंधू उपांत्यफेरीत दाखल

दुहेरी सामन्यांव्यतिरिक्त भारताने एकेरी सामन्यात मात्र चांगली कामगिरी केली. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने इंडोनेशियाच्या फित्रीयानीला नमवत स्पर्धेत उपांत्यफेरी गाठली. तर पुरूष गटात बी. साईप्रणित आणि श्रीकांतने विजय मिळवत उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या व्यतिरिक्त एच.एस. प्रणॉयला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -