Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Mamata Banerjee : आमचा भारत नावावर आक्षेप नाही, पण...; ममता बॅनर्जींचा मोदी...

Mamata Banerjee : आमचा भारत नावावर आक्षेप नाही, पण…; ममता बॅनर्जींचा मोदी सरकारवर निशाणा

Subscribe

Mamata Banerjee : सध्या देशाचे नाव बदलण्यावरून भारतामध्ये जोरदार वाद सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. G-20 स्नेह भोजणाच्या निमंत्रणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘इंडियाचे राष्ट्रपती’ ऐवजी ‘भारताचे राष्ट्रपती’ असे संबोधण्यात आल्याने हा वाद आणखी वाढला. याच वादावर बोलताना पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)  यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. याशिवाय त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. (Mamata Banerjee We have no objection to the name Bharat but Mamata Banerjee targets Modi government)

हेही वाचा – G-20 मध्ये ऋषी सुनक यांच्याकडे दुर्लक्ष! ब्रिटिश मीडियाचा आरोप; म्हणाले…

- Advertisement -

पत्रकार परिषदेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आमचा भारत नावावर कोणताही आक्षेप नाही, परंतु संविधानात सुधारणा न करता इंडिया नाव काढून टाकणे असंवैधानिक आणि चुकीचे ठरेल. कारण आम्हीसुद्धा भारत म्हणतो, या देशातील लोक सुद्धा भारत म्हणतात. पण मोदी सरकारने भारताला तोडले आहे, हे योग्य नाही. आपल्या राज्यघटनेतही भारत आहे, असे दिसते. याशिवया आम्ही आमच्या युतीला ‘इंडिया’ हे नाव दिले आहे.

अभिषेक बॅनर्जींविरोधात कोणतेही पुरावे नाहीत

अंमलबजावणी संचालनालयाने टीएमसी नेते आणि ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, अंमलबजावणी संचालनालयाने 13 सप्टेंबर रोजी अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी बोलावले आहे. परंतु हे सर्व राजकीय सूडापोटी होत आहे. अभिषेक बॅनर्जी विरोधात त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. फक्त त्यांचा छळ करण्यासाठी त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाने बोलावले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कदाचित आम्ही सरकारला अडचणीत आणलं; राहुल गांधींनी ‘इंडिया वि. भारत’ वादावर केंद्राची उडवली खिल्ली

चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेवर दिलेले वक्तव्य

कथित कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी तेलगू देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी (9 सप्टेंबर) सकाळी अटक करण्यात आली. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर ते सध्या कारागृहात आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेवर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मला चंद्राबाबू नायडूंची अटक आवडली नाही. त्यांना सूडबुद्धीने अटक करण्यात आली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

- Advertisment -