घरदेश-विदेशसोशल मीडियाच व्यसन असलेल्या पत्नीची केली हत्या

सोशल मीडियाच व्यसन असलेल्या पत्नीची केली हत्या

Subscribe

घरकामात लक्ष न देता सोशल मीडियावर वेळ घालवणाऱ्या महिलेची पतीने हत्या केली आहे. या महिलेवर रॉकेट टाकून तिला पेटवले. पत्नी सोबतच त्याने ३ महिन्याच्या मुलाचीही हत्या केली.

वेळेनुसार सोशल मीडियाचा वापर हा आरोग्याला घातक आहे. मागील काही वर्षात सोशल मीडियावर अकाऊंटची संख्या  वाढत चालली आहे यावरून लोकांमध्ये सोशल मीडियाचा वापर जास्त प्रमाणात केला जात असल्याचे चित्र आहे. या सोशल मीडियाच्या अतीवापरामुळे एका महिलेला आपला जीव गमावावा लागला आहे. सुशमा (२५) असे या महिलेचे नाव असून ती बंगळुरू येथे राहत होती. घरची काम न करत असल्यामुळे तिचे वाद होत होते. सुशमा ही अधिक वेळ सोशल मीडियावर घालवत असल्याची तक्रार तिचा पती राजू याने केली. सुशमाच्या हत्येनंतर दोन दिवसांनी तिच्या पतीला अटक करण्यात आले. राजूने रागाच्या भरात आपल्या तीन महिन्याच्या मुलाचाही खून केला.

फेसबुकद्वारे झाली होती ओळख

राजू आणि सुशमा यांची ओखळ फेसबुकवरून झाली होती. नंतर ओखळीचे रुपांतर प्रेमात झाले. सुशमा लग्नाअगोदर गरोदर राहिल्यामुळे त्यांच्या घरच्यांनी विवाहाला परवानगी दिली. मात्र विवाहानंतरही सुशमा सोशल मीडियाचा वापर करत होती. यामुळे राजूला तिचा राग यायचा. अनेकदा त्याच्यात या कारणामुळे यादोघांमध्ये भांडण होत होती. अखेर एका दिवशी घरात याच कारणावरून त्यांची भांडणे झाली होती. रागाचा भडका उडल्यामुळे राजूने सुशमाच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवले. यानंतर रागाच्या भरात तीन महिन्याच्या मुलाचीही हत्या केली. काही दिवसापासून मुलीचा फोन येत नसल्यामुळे चिंतीत आईने पोलिसांकडे याची तक्रार केली. पोलिसांनी राजूला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर राजूने खून केल्याची कबूली दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -