घरदेश-विदेशराहुल गांधी आणि चुंबन; नेमकं चाललंय तरी काय?

राहुल गांधी आणि चुंबन; नेमकं चाललंय तरी काय?

Subscribe

राहुल गांधी यांच्या गालावर चुंबन घेण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. चुंबन घेत्यावेळी राहुल गांधी गोंधळात पडतात. मात्र, यातून लोकांचे त्यांच्याप्रती असणाऱ्या प्रेमाचे दर्शन होते. आता या चुंबनांना कोणत्या दृष्टीकोनाने बघायचे हे ज्याचे त्याने ठरवावे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जनसामान्यांमध्ये सेलेब्रेटींप्रमाणे प्रचंड क्रेझ आहे. अर्थात राजकारणी जरी असले तरी ते देखील एक सेलेब्रेटीच आहेत म्हणा. राहुल गांधींच्या लग्नाच्या गोसिप्सपासून ते काँग्रेसचे अध्यक्ष पद या साऱ्या गोष्टींवर देशभरातील नागरिकांमध्ये नेहमी चर्चा रंगत असते. सध्या राहुल गांधी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि त्या चर्चेचे कारण ठरले आहे ते म्हणजे चुंबन! राहुल गांधी सध्या त्यांच्या वायनाड मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राहुल गांधी वायनाडमध्ये फिरत आहेत. मात्र, वायनाडमध्ये एक प्रसंग असा आला की त्यांना देखील कळले नाही की, आता यापुढे काय करावे? राहुल गांधी गोंधळात पडले. कारण गाडीतून जात असताना माध्यमांचे प्रतिनिधी त्यांना काही प्रश्न विचारत होते. यावेळी एक व्यक्ती गर्दीतून पुढे आली आणि त्याने चक्क राहुल गांधींचे चुंबन घेतले. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

- Advertisement -

याअगोदरही राहुल गांधींचे महिलेने घेतले होते चुंबन

सार्वजनिक ठिकाणी सर्वांसमोर राहुल गांधींचे चुंबन घेण्याची ही पहिला घटना नाही. याअगोदरही अशा घटना घडल्या आहेत. याच वर्षी फेब्रुवारीत राहुल गांधी गुजरात राज्यातील वलसाड येथे सभेसाठी गेले होते. त्यावेळी स्वागत करायला आलेल्या एका महिलेने मंचावर त्यांचे चुंबन घेतले होते. त्यावेळी देखील राहुल गांधी असेच गोंधळात पडले होते. मात्र, त्या घटनेचा व्हिडिओही प्रचंड व्हायरल झाला होता.

woman kissed rahul gandhi

- Advertisement -

आसाममध्येही दोन महिलांनी घेतले होते चुंबन

राहुल गांधी २०१४ साली आसाम दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी देखील दोन महिलांनी राहुल गांधी यांच्या गालावर चुंबन घेतले होते. आसाममधील जोरहाट येथे ही घटना घडली होती. त्यावेळी देखील राहुल गांधी गोंधळात पडले होते. वारंवार राहुल गांधींसोबत चुंबनाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या घटनांमधून राहुल गांधी यांच्यावर जनतेचे किती प्रेम आहे ते पाहायला मिळत आहे. मात्र अशा प्रसंगामुळे राहुल गोंधळात नक्की पडतात.

woman kissed rahul gandhi


हेही वाचा – आपकी मनपसंद स्वीट डिश? इज्जत का फालूदा; राहुल गांधी ट्रोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -