घरदेश-विदेशमुलांसाठी त्याने चक्क रिक्षा बनवली! पाहा 'क्यूट ऑटो रिक्षा'

मुलांसाठी त्याने चक्क रिक्षा बनवली! पाहा ‘क्यूट ऑटो रिक्षा’

Subscribe

आपल्या मुलाच्या हट्टासाठी केरळच्या एका पित्याने एक लहान छोटीशी रिक्षा बनवली आहे. विशेष म्हणजे ही रिक्षा रस्त्यावर धावते देखील!

केरळच्या एका पित्याने आपल्या लहान मुलांसाठी एक खरीखुरी रिक्षा बनवली आहे. ही रिक्षा आकाराने लहान, फार सुंदर आणि आकर्षक अशी आहे. त्यामुळे ही रिक्षा जगभर चांगलीच प्रचलित होताना दिसत आहे. ही रिक्षा बनवणाऱ्या कलाकाराचे नाव अरुण कुमार पुरुषोत्तम असे आहे. आपल्या लहान मुलांना खेळण्यासाठी त्याने ही रिक्षा बनवली आहे. ही रिक्षा रस्त्यावर चालते तेव्हा ती उभेउभे खऱ्याखुऱ्या रिक्षासारखी भासते. अरुणने बनवलेल्या या रिक्षाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर त्याच्या या रिक्षाला लोकांनी ‘क्यूट ऑटो रिक्षा’ असे नाव ठेवले आहे.

- Advertisement -

मुलाने वडिलांकडे केला होता हट्ट

अरुणचा पाच वर्षीय मुलगा माधव कृष्ण हा १९९० साली आलेल्या ‘ऐ ऑटो’ या मल्यालम चित्रपटाचा मोठा फॅन आहे. त्याने हा चित्रपट पाहिल्यानंतर ‘चित्रपटामध्ये जशी रिक्शा आहे, अगदी तशीच रिक्शा आपल्याला हवी आहे’, असा हट्ट आपल्या वडिलांकडे केला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी सात महिन्यांध्ये खरोखरच तशीच मिनी ऑटो बनवली, जी रस्त्यावर पळते देखील!

गाडी बनवण्याची कला तो लहानपणीच शिकला

अरुण सांगतो की, जेव्हा तो छोटा होता, तेव्हा त्याला गाड्यांसोबत खेळायला फार आवडायचे. आपल्याजवळ एक गाडी असावी, अशी त्यांची इच्छा होती. परंतु, घरची परिस्थिती बेताची असल्याकारणाने त्याला गाडी घेता आली नाही. त्यामुळे आता ज्या गोष्टींची कमतरता आपल्याला भासली, ती कमतरता आपल्या मुलांना वाटू नये, म्हणून त्याने ही रिक्षा बनवली आहे. तो सांगतो की, त्याचे वडील कारपेंटर होते. त्याच्या वडिलांनी त्याला एका जुन्या सायकलला लाकडाचे चाक बसवून दिले होते. तेव्हापासून तो देखील आल्या वडिलांचे अवजारे चालवायला शिकला. आपल्या वडिलांकडूनच गाडी बनवायचो शिकलो, असे अरुणने सांगितले आहे. अरुणने लहानपणी बरेच खेळणी बनवले होते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या होत्या. जेव्हा तो १० ला होता, तेव्हा त्याने गाडी बनवण्यात बक्षिस मिळवले होते. त्यावेळी त्याने जेसीबी बनवले होते. मात्र, उच्च शिक्षणाकडे वळल्यावर त्यांच्या या कलेकडे दुर्लक्ष झाले. मात्र, पुडुचेरीला राहायला आल्यावर त्याच्यातली कला पुन्हा जागी झाली. त्याने आपल्या लहान मुलांसाठी एसयुवी कारपासून अनेक वाहवे बनवले. सध्या त्याने बनवलेली ऑटो रिक्षा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याने आपला मुलगा माधव आणि मुलगी केशिनी यांचा दोघांचा रिक्षासोबत खेळताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -