घरदेश-विदेशडेटा चोरीची माहिती फेसबुकला होती?

डेटा चोरीची माहिती फेसबुकला होती?

Subscribe

२०१८ मध्ये फेसबुक युजर्सची माहिती चोरीला गेल्याचा आरोप फेसबुकवर होत होता. यासंदर्भात आपल्याला माहिती नाही, असे मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले होते. परंतु, ब्रिटनच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार डेटा चोरीची माहिती फेसबुकला होती, अशी माहिती समोर आली आहे.

२०१८ मध्ये फेसबुकचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर भारतात मोठा गदारोळ झाला होता. लोकांनी फेसबुकवर टीका केली होती. यासंदर्भात फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी माफिही मागितली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या डेटा चोरी माहित नव्हते असे सांगितले होते. परंतु, ब्रिटनच्या ऑब्झर्व्हरने दिलेल्या माहितीनुसार फेसबुकला संपूर्ण माहिती होती. कारण यासंदर्भात फेसबुकचे बोर्ड सदस्य मार्क आंद्रेसीन आणि केंब्रिज अॅनालिटिकाचे अधिकारी क्रिस्तोफर वाईली यांच्यामध्ये बैठका झाल्या होत्या.

काय आहे नेमकं प्रकरण?

केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीने फेसबुकच्या सुमारे ८.७ कोटी युजर्सचा डेटा चोरी केला असल्याची माहिती २०१८व मध्ये उघड झाली होती. या संदर्भात माहिती फेडरल ट्रेड कमिशनने दिली होती. फेडरल ट्रेडने फेसबुकच्या डेटा लीक प्रकरणाची चौकशी केली होती. तेव्हा फेडरले ट्रेडने सांगितले होते की, २०११ मध्ये फेसबुकवर तयार झालेल्या सेफगार्ड युजर्सच्या प्रायव्हसीच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. यानंतर आता ब्रिटनच्या ऑब्झर्व्हरने दिलेल्या माहितीनुसार, ‘फेसबुकचे बोर्ड सदस्य मार्क आंद्रेसीन आणि केंब्रिज अॅनालिटिकाचे अधिकारी क्रिस्तोफर वाईली यांच्यामध्ये बैठका झाल्या होत्या. या बैठकीत केंब्रिज अॅनालिटिका फेसबुक युजर्सच्या डेटाचा कशाप्रकार वापर करेल या गोष्टींवर चर्चा झाली होती.’ या बातमीनंतर रेग्युलेटर्सने या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरु केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -