घरदेश-विदेश२१व्या वर्षी तो न्यायाधीशपदी विराजमान!

२१व्या वर्षी तो न्यायाधीशपदी विराजमान!

Subscribe

न्यायाधीश होण्यासाठी प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा असल्याचे मत त्याने मांडले.

राजस्थान ज्युडिशिअल सर्व्हिसेस ही परीक्षा उत्तीर्ण होत जयपूरच्या मयंक प्रताप सिंह अवघ्या २१व्या वर्षी न्यायाधीशपदी विराजमान झाला आहे. राजस्थान ज्युडिशिअल सर्व्हिसेस या परीक्षेत पहिला येत मयंक प्रताप सिंह याने इतिहास रचला आहे. देशातील सर्वात कमी वयात न्यायाधीशपदी विराजमान होण्याचा मान पटकावल्याने त्याची ही कामगिरी विशेष ठरली आहे. मयंक पाठोपाठ राजस्थान ज्युडिशिअल सर्व्हिसेस या परीक्षेत मुलींनीसुद्धा उत्तम कामगिरी केली आहे. या परीक्षेत जयपूरच्या तन्वी माथूरने दुसरा क्रमांक पटकावला आहे.

पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश

काही दिवसांपूर्वी या परीक्षेचा निकाल लागला. राजस्थान ज्युडिशिअल सर्व्हिसेस या परीक्षेत प्रथम आलेल्या मयंकवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे मयंकने पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. यावेळी राजस्थान उच्च न्यायालयाकडून परीक्षेसाठीची वयोमर्यादा २१ वर्षे करण्यात आली होती. या संधीचा लाभ घेत मयंकने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. मयंक पाठोपाठ राजस्थान ज्युडिशिअल सर्व्हिसेस या परीक्षेत मुलींनीसुद्धा उत्तम कामगिरी केली आहे. या परीक्षेत जयपूरच्या तन्वी माथूरने दुसरा क्रमांक पटकावला आहे.

- Advertisement -

या परीक्षेच्या अभ्यासासाठी मी एक वेळापत्रक आखलं होतं. त्यानुसार दिवसातील जवळपास १२-१३ तास अभ्यासाला प्राधान्य दिलं. न्यायाधीश होण्यासाठी प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा आहे. याच इमानदारीच्या बळावर मला हे यश मिळालं.
मयंक प्रताप सिंह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -