घरदेश-विदेशव्यवसायवाढीसाठी केला होता अँटिग्वाच्या नागरिकत्वाचा अर्ज - मेहुल चोक्सी

व्यवसायवाढीसाठी केला होता अँटिग्वाच्या नागरिकत्वाचा अर्ज – मेहुल चोक्सी

Subscribe

भारतीय तपास यंत्रणा आणि मीडियाकडून लावण्यात आलेले आरोप खोटे असून यात कोणतंही तथ्य नसल्याचं मेहुल चोक्सीनं एक स्पष्टीकरण देऊन म्हटलं आहे.

पीएनबीच्या १३४०० कोटीच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हिरा व्यापारी मेहुल चोक्सीनं मागच्या वर्षीच व्यवसायवाढीसाठी करेबियन देश अँटिग्वाची नागरिकता घेतली असल्याचा दावा केला आहे. अँटिग्वाच्या स्थानिक मीडियानं दिलेल्या बातमीनुसार, चोक्सीनं अँटिग्वाच्या पासपोर्टवर १३२ देशात विनाव्हिसा फिरण्याची सूट असल्याचा दावा केला आहे. ‘डेली ऑबर्झव्हर’नं दिलेल्या बातमीनुसार, चोक्सीच्या वतीनं त्याचे वकील डेव्हीड डोरसेटनं स्पष्टीकरण दिलं आहे. या स्पष्टीकरणात भारतीय तपास यंत्रणा आणि मीडियाकडून लावण्यात आलेले आरोप खोटे असून यात कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.

Mehul-choksi-statement
मेहुल चोक्सीचं स्पष्टीकरण

२०१७ मध्येच मिळाली होती नागरिकता

‘सिटीझनशिप बाय इन्व्हेस्टमेंटच्या प्रोग्राम अंतर्गत वैधरित्या अँटिग्वा आणि बारबुडाची नागरिकता मिळण्यासाठी अर्ज केला होता. अर्जादरम्यान कायद्यानुसार आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी केल्या. नागरिकता मिळवण्यासाठी अर्जाच्या अटींप्रमाणेच मंजुरी मिळाली आहे.’ असं ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं दिलेल्या वृत्तानुसार, मेहुल चोक्सीनं आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे. चोकसीनं २०१७ मध्ये अँटिग्वाची नागरिकता मिळवली असून १५ जानेवारी, २०१८ रोजी देशभक्तीची शपथ घेतली असल्याचं बातमीत म्हटलं आहे.

- Advertisement -

जानेवारीत झाला फरार

चोक्सी आपल्यावरील उपचारासाठी जानेवारी महिन्यात अमेरिकेत होता. त्याच्या स्पष्टीकरणानुसार करेबियन देशामध्ये व्यवसाय वाढीसाठी नागरिकत्व मिळवलं होतं. मेहुल सध्या उपचारानंतर आराम करत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं सीबीआयनं अँटिग्वाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून फरार हिरा व्यापारी मेहुल चोक्सीच्या सध्याच्या निवासासंदर्भात माहिती मागवली आहे. जानेवारी महिन्यातच मेहुल चोक्सी अमेरिकतून फरार झाला होता. दरम्यान पीएनबी घोटाळा हा फेब्रुवारीमध्ये उघडकीस आला होता. यामध्ये त्याचा भाचा नीरव मोदी याचादेखील सहभाग आहे. या घोटाळ्यामुळं बँकिंग क्षेत्रामध्ये खूपच खळबळ माजली होती.

८ जुलैला अमेरिकेतून फरार 

तपास यंत्रणांच्या अंदाजानुसार, मेहुल चोक्सीला तपासाबाबत कोणीतरी माहिती पुरवत आहे. कारण इंटरपोलनं ९ जुलैला त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस काढली होती. मात्र, तपास यंत्रणेला त्याआधी एक दिवस ८ जुलैला मेहुल चोक्सी फरार झाल्याची माहिती मिळाली. ८ जुलैलाच मेहुल चोक्सी जेट ब्ल्यू एअरवेजच्या फ्लाईटमधून अँटिगाला पळून गेल्याची माहिती मिळाली आहे. मेहुल चोक्सीला त्याच्या अटक होण्याची बातमी आधीच मिळाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर २४ जुलैला सीबीआयकडून अधिकाऱ्यांना मेहुल चोक्सीची माहिती देण्यासाठी पत्र पाठवण्यात आलं आहे. दरम्यान मेहुल चोक्सीला संपूर्ण घोटाळ्यामागील ‘मास्टरमाईंड’ असं म्हणत ईडीनं त्याच्याविरुद्ध चार्जशीट फाईल केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -