घरमहाराष्ट्रआरक्षण मुद्द्यावरुन शनिवारी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक

आरक्षण मुद्द्यावरुन शनिवारी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक

Subscribe

राज्य सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक आयोजित केली आहे. शनिवारी सायंकाळी विधानसभेत हि बैठक होणार असून यावर काय तोडगा निघणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलेले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाजाने भाजप सरकारला धारेवर धरले. याकाळात चुकीचे वक्तव्य केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली गेली. राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाने बंद पुकारला, त्यात बऱ्याच ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले होते. त्यामुळेच आता राज्य सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक आयोजित केली आहे. शनिवारी सायंकाळी विधानसभेत हि बैठक होणार असून यावर काय तोडगा निघणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री मराठा संघटनांच्या प्रतिनिधींशी संपर्कात असल्याचे चंद्रकात पाटील यांनी सांगितले आहे. आघाडी सरकारच्या तुलनेत भाजप-सेना सरकारने मराठा आरक्षणबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावेळी केला आहे. तसेच सरकारने मागासवर्गीय आयोगाचा अहवाल लवकरात लवकर कोर्टापुढे सादर करावा, अशी सूचना दानवे यांनी केली आहे.

- Advertisement -

मराठा आमदारांचे राजीनामा अस्त्र

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने राज्यभरात सुरु केलेल्या ठोक मोर्च्याच्या आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीच्या पात्रात जलसमाधी घेतली आणि त्यानंतर हे आंदोलन अधिकच पेटले पण कोणत्याही मराठा नेत्याने यासंदर्भात भाष्य केले नाही. त्यामुळे मराठा समाजाने नेत्यांवर रोष व्यक्त केला. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आमदारांनी राजीनामा देण्याचा सपाटा सुरु केला आहे. आतापर्यंत ६ आमदारांनी राजीनामा दिला आहे. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पेटलेल्या या वातावरणाला सरकारकडून शांत करण्याचे कसोटीचे प्रयत्न सुरु आहेत. म्हणूनच सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेवून त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -