घरदेश-विदेशचुलीच्या धुराने भारतात १ लाख बालके गुदमरली

चुलीच्या धुराने भारतात १ लाख बालके गुदमरली

Subscribe

हवेच्या प्रदुषणामुळे भारतात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू

घरात जेवणासाठी वापरण्यात येणारे इंधन हे नवजात बालकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. अन्न शिजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनाचा हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन नवजात बालकांच्या वजनावरही परिणाम होत आहे. तसेच बालकांचा वेळेआधी जन्म होण्याचा गोष्टीवरही हवेचे प्रदुषण कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे. हवेच्या प्रदुषणाचा नवजात बालकांवरही परिणाम होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. एकट्या भारतातच २०१९ या एका वर्षात १ लाख १६ हजार नवजात बालकांचे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. जागतिक पातळीवर झालेल्या हवेच्या गुणवत्तेच्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. मुख्यत्वेकरून जेवण शिजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनामुळे हवेच्या प्रदुषणात वाढ झाल्याचे उघड झाले आहे.

घरगुती अन्न शिजवण्याच्या प्रक्रियेत चारकोल, लाकुड, गोवऱ्या यासारख्या गोष्टींचा वापर झाल्यानेच हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याची आकडेवारी आहे. हवेच्या प्रदुशणाच्या दीर्घकालीन अशा संपर्कात आल्यानेच १ लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. स्ट्रोक, हार्ट अटॅक, मधुमेह, फुफ्फुसाचा कर्करोग, क्रोनिक लंग डिजिझ आणि निओनॅटल डिझिझ यामुळे हे मृत्यू २०१९ सालामध्ये झाले आहेत. अनेक अर्भकांच्या मृत्यूंमध्ये कमी वजनाची बालके आणि वेळेपूर्वी बालकांचा जन्म होणे या कारणांचाही समावेश आहे. हेल्थ इफेक्ट इंस्टिट्यूटने वार्षिक ग्लोबल एअर २०२० रिपोर्ट जाहीर केला आहे. भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळ अशा दहा आशियाई देशांमधील पीएम २.५ च्या उत्सर्जनाचा अभ्यास या संस्थेकडून करण्यात आला. वर्ष २०१० ते २०१९ या कालावधीत या देशांमध्ये पीएम २.५ च्या पातळीत वाढ झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या काळात अनेक लोकांना ह्दय आणि फुफ्फुसाचे आजार बळावत असतानाच हा अहवाल समोर आला आहे.

- Advertisement -

भारतात २०१० पासून हवेच्या प्रदुषणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये घराच्या ठिकाणी अन्न शिजवण्यासाठी वापरण्यात येणारे इंधन हाच घटक हवेच्या प्रदुषणासाठी मुख्यत्वेकरून कारणीभूत होता. गेल्या काही वर्षात प्रधान मंत्री उज्वला योजना घरगुती एलपीजी योजनेचा फायदा अनेकांना झाला. त्यामुळे स्वच्छ ऊर्जेचा पर्याय मिळताना घरगुती अन्न शिजवण्यासाठी स्वच्छ असे इंधन उपलब्ध झाले. कोरोनाचा आणि हवेच्या प्रदुषणाचा थेट काय संबंध असू शकतो याचा अंदाज आताच बांधता येणार नसल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. पण अर्भकांचा मृत्यू हा कोणत्याही समासाठी अतिशय घातक आहे. दक्षिण आशियाई देशांमध्ये तसेच पूर्व आशियाई देशांमध्ये वाढते हवेचे प्रदुषण हे येणाऱ्या पिढ्यांसमोरील आव्हान आहे असे एचईआयचे अध्यक्ष डॅन ग्रीनबाऊम यांनी स्पष्ट केले.


 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -