घरदेश-विदेशमुकुल रोहतगी असतील नवे अॅटर्नी जनरल, १ ऑक्टोबरपासून सुरू होणार दुसरा कार्यकाळ

मुकुल रोहतगी असतील नवे अॅटर्नी जनरल, १ ऑक्टोबरपासून सुरू होणार दुसरा कार्यकाळ

Subscribe

नवी दिल्ली – मुकुल रोहतगी हे देशाचे नवे अॅटर्नी जनरल असतील. त्यांचा दुसरा कार्यकाळ १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. 2014 ते 2017 या केंद्रातील मोदी सरकारच्या पहिल्या 3 वर्षात मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल म्हणून पदभार स्वीकारला होता. मात्र, जून २०१७ मध्ये त्यांनी वैयक्तिक कारणास्तव अॅटर्नी जनरल पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी खासगी प्रॅक्टिस सुरू केली. केके वेणुगोपाल यांची जागा मुकुल रोहतगी घेतील.

वेणुगोपाल यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. सरकारने पुन्हा एकदा 90 वर्षीय वेणुगोपाल यांचा कार्यकाळ वाढवण्याची ऑफर दिली होती. पण वाढत्या वयाचा आणि प्रकृतीचा हवाला देत त्यांनी ते मान्य केले नाही. 2017 मध्ये मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल पदाचा राजीनामा दिल्यानंतरच वेणुगोपाल यांनी पदभार स्वीकारला होता. आता मुकुल वेणुगोपाल यांच्याकडून पदभार स्वीकारतील.

- Advertisement -

2014 मध्ये पहिल्यांदा मोदी सरकार स्थापन झाले तेव्हा रोहतगी यांची तीन वर्षांसाठी अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2017 मध्ये जेव्हा कार्यकाळ संपुष्टात आला तेव्हा सरकारने त्यांची मुदत वाढवण्याची ऑफर दिली होती. मात्र, रोहतगी यांनी जून 2017 मध्ये राजीनामा दिला.

यानंतर वेणुगोपाल यांची या अॅटर्नी जनरल पदावर ३ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. 2020 मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर त्यांचा कार्यकाळ प्रत्येकी एक वर्षासाठी दोनदा वाढवण्यात आला. या वर्षी जूनमध्ये वेणुगोपाल यांचा कार्यकाळ पुन्हा तीन महिन्यांनी वाढवण्यात आला.

- Advertisement -

मंत्रालयातील सूत्रांनी आणि रोहतगी यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुल रोहतगी यांच्या नावावर चर्चा करण्यासाठी गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. ज्यानंतर रोहतगी यांना संमती दिली आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास १ ऑक्टोबरला देशाला नवे अॅटर्नी जनरल मिळेल.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -