घरदेश-विदेशCovid-19: व्हिटॅमिन, ओमेगा -३ आणि प्रोबायोटिक्समुळे कोरोनाचा धोका कमी! - शास्त्रज्ञांचा दावा

Covid-19: व्हिटॅमिन, ओमेगा -३ आणि प्रोबायोटिक्समुळे कोरोनाचा धोका कमी! – शास्त्रज्ञांचा दावा

Subscribe

देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राखण्यााठी अनेक देशांमध्ये प्रयत्न केले जात आहे. एकीकडे झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाच्या संसर्गामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे औषध विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. यासह करोनाच्या विषाणूवरही संशोधन केले जात आहे. ब्रिटनच्या किंग्ज कॉलेजसह विविध संस्थांमधील शास्त्रज्ञांनी वाढत्या कोरोनाच्या संसर्गादरम्यान एक अभ्यास केला.

या अभ्यासात त्यांनी असे दावा केला की, मल्टी-व्हिटॅमिन, ओमेगा -3 फॅटी अॅसिडस्, प्रोबायोटिक्स किंवा व्हिटॅमिन-डी आणि पूरक आहार घेतल्यास कोरोना संसर्ग होण्याता धोका कमी होऊ शकतो. यासोबत त्यांनी असेही म्हटले की, व्हिटॅमिन सी, जस्ताच्या गोळ्या सेवनाने कोरोनाचा धोका कमी संभवतो, यासंदर्भातील कोणताही पुरावा आढळला नाही.

- Advertisement -

असं केलं शास्त्रज्ञांनी संशोधन

आपल्या संशोधनासाठी, शास्त्रज्ञांनी रोगाच्या लक्षणांचा अभ्यास करण्यासाठी तयार केलेल्या मोबाइल अ‍ॅप्समधील माहितीचा आधार घेतला. ब्रिटनमधील साधारण ३.७२ लाख लोकांनी हे अॅप्लिकेशन वापरले असून यामध्ये खाण्या-पिण्यासह पूरक आहारांच्या (सप्लीमेंट्स) माहितीची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मे ते जुलै या कालावधीत १.७५ लाख युजर्स सप्लीमेंट्स घेतली. त्यापैकी केवळ २३.५ हजार लोकांनाच कोरोनाचा संसर्ग झाला.

इस्रायलमधील हिब्रू विद्यापीठाच्या ग्रास सेंटर ऑफ बायोइंजिनियरिंग विभागाचे संचालक प्रा. याकोव नाहमियास यांनी न्यूयॉर्कच्या माउंट सिनाई मेडिकल सेंटरमधील बेंजामिन टेनोएवर यांच्यासोबत एक संशोधन केले. या संशोधनात कोरोनाचा धोका कमी ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉलचे औषध प्रभावी ठरू शकते, असा दावा करण्यात आला. यासह कोलेस्ट्रॉलविरोधी औषध ‘फेनोफायब्रेट’ या औषधामुळे कोरोना आजाराचा धोका कमी करता येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. कोरोनाचा विषाणू फुफ्फुसामध्ये जमा होतात. त्यांना दूर करण्यासाठी ‘फेनोफायब्रेट’ औषध प्रभावी ठरू शकतो, असा दावा त्यांनी केला.


मेडिकल फेस्क मास्क की फॅब्रिक मास्क? कोणतं आहे सुरक्षित, WHO कडून गाईडलाईन्स जारी
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -