घरदेश-विदेशहॉटेलमध्ये बॉम्ब आहे; शुल्लक कारणावरुन तरुणीने केला 'फेक कॉल'

हॉटेलमध्ये बॉम्ब आहे; शुल्लक कारणावरुन तरुणीने केला ‘फेक कॉल’

Subscribe

गोव्याच्या पणजी येथील कलंगुट परिसरात असलेल्या एका हॉटेल मध्ये बॉम्ब असल्याचा फोन या तरुणीने केला होता. या प्रकरणी तीला पोलिसानी अटक केली आहे.

मुंबईच्या मालाड परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय रंगोली पटेल नामक तरुणीने पोलिसांना बॉम्ब असल्याचा बोगस फोन केला होता. या प्रकरणी गोवा पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे. दरम्यान, ही तरुणी एमबीएची विद्यार्थीनी असून मुंबईला हॉस्टेलमध्ये राहते. दोन दिवसांची सूट्टी असल्याने ही तरुणी तिच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी गोव्याला आली होती. तेथील एका हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळी ती मित्रांसोबत जेवायला गेली. यावेळी त्यांच्यात वाद होत असल्याने वेटरने त्यांना हटकल्याचा राग आल्याने तिने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.

बॉम्ब असल्याचा निनावी फोन

पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी मित्रांसोबत गोव्याच्या पणजी येथील कलंगुट येथील एका हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळी जेवणासाठी आली होती. यावेळी तिच्या सोबत आलेल्या मित्राने दारुच्या नशेत जोरजोरात भांडण करू लागला. त्या दोघांना भांडताना बघून वेटरने त्यांना हटकले. मात्र त्यानंतर देखील त्या दोघांचे भांडण सुरुच होते. त्यामुळे त्या दोघांना वेटरने हॉटेलमधून जायला सांगितले. यानंतर ते दोघेही हॉटेल बाहेर पडले आणि त्यांनी दोघांच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या वेटरला धमकावले. याच रागातून त्या तरुणीने रात्री एकच्या सुमारास पोलिसांना पणजी पासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कलंगुट परिसरातील हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा फोन केला, अशी माहिती कलंगुट पोलीस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली आहे.

- Advertisement -

तरुणीला अटक

भारत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क असल्याने त्यांनी लगेच या फोन कॉलची दखल घेऊन तपास करण्यास सुरवात केली. दरम्यान, या फोन कॉलनंतर तरुणीने लगेच आपला फोन आऊट ऑफ कव्हरेज केला. त्यामुळे पोलिसांनी या फोन कॉलचा तपास करण्यास सुरवात केली असता फोन बंद लागत होता. सदर कॉल हा बनावट असल्याचे लक्षात अल्यावर पोलिसांनी फोन क्रमाकांची माहिती मिळवली असता सदर फोनचे लोकेशन मिळाले. या लोकेशनवर तरुणी आपल्या मित्रांसोबत राहत होती. पोलिसांनी ताबडतोब या प्रकरणी तरुणीला ताब्यात घेतले.

गुन्हा केला कबूल

तरुणीला पोलीस स्टेशनला नेल्यावर तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. वेटरने आम्हाला हॉटेलमधून बाहेर काढले आणि माझ्याशी वाद घातला. त्याच रागातून सदर फोन कॉल केला असल्याचे तरुणीने कबूल केले आहे. दरम्यान, या प्रकरणी न्यायालयाने तिचा जामिन फेटाळून लावला आहे. तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -