घरदेश-विदेशNarendra Modi : सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसने उघडपणे लोकशाहीचा गळा घोटला; मोदींचा आरोप

Narendra Modi : सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसने उघडपणे लोकशाहीचा गळा घोटला; मोदींचा आरोप

Subscribe

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेसवर सडकून टीका केली. नरेंद्र मोदी यांनी गंभीर आरोप केला की, सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसने उघडपणे लोकशाहीचा गळा घोटला. (Narendra Modi Congress openly strangles democracy in lust for power Narendra Modi allegation)

राज्यसभेत बोलताना मोदी म्हणाले की, मला मल्लिकार्जुन खर्गे यांचे आभार मानायचे आहेत. त्यांनी एनडीएला 400 जागांचा आशीर्वाद दिले आहेत. काही दिवसांपूर्वी केलेल्या भाषणात त्यांना बोलण्याचे स्वातंत्र्य कसे काय मिळाले? याचे मला आश्चर्य वाटते. माझ्या लक्षात आले की, त्याच्यासोबत असलेले दोन कमांडो त्यादिवशी त्याठिकाणी उपस्थित नव्हते. त्यामुळे ते मोकळेपणाने बोलू शकले. हे स्वातंत्र्य पुन्हा कधी मिळणार? असा प्रश्नही नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – NCP : कोणत्या गटाकडे किती संख्याबळ! दोन्ही बाजूने सह्या केलेले पाच आमदार कोण?

काँग्रेसवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की, आजही तुम्ही माझे न ऐकण्याच्या तयारीने आला आहात. पण तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाहीत. कारण या आवाजाला देशातील जनतेने बळ दिले आहे. देशातील जनतेच्या आशीर्वादाने आवाज निघत आहे. त्या दिवशी तुम्ही (विरोधकांनी) माझ्यावर केलेल्या अत्याचाराला आज मी उत्तर देण्यासाठी आलो आहे, असे म्हणत मोदी म्हणाले की, काँग्रेस चाळीशी पार करू शकणार नाही, असा आवाज पश्चिम बंगालमधून आला होता. मी प्रार्थना करतो की तुम्ही 40 जागा वाचवा.

- Advertisement -

विचार करण्यापलीकडे काँग्रेस पक्ष जुना

मोदी म्हणाले की, ‘मी ऐकले आहे की लोकशाहीत तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे आणि ऐकण्याची जबाबदारी आमची आहे. आज जे काही घडले आहे ते मी देशासमोर ठेवले पाहिजे. हे ऐकल्यावर माझा विश्वास पक्का झाला की, हा पक्ष (काँग्रेस) विचार करण्यापलीकडे जुना झाला आहे. त्यांचे विचार जुने झाले आहेत, त्यांचे कार्यही जुने झाले आहे. एवढा मोठा पक्ष देशावर इतकी दशके राज्य करणारा पक्ष काही वेळातच असा झाला. पण आम्ही आनंदी नाही, तर आम्ही सहानुभूती आहोत. कारण पेशंट असा असेल तर डॉक्टर तरी काय करणार? असा प्रश्नही मोदींनी उपस्थित केला.

हेही वाचा – Maharashtra Politics : संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याला गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला

मोदी म्हणाले की, ‘ज्या काँग्रेसने सत्तेच्या लालसेपोटी लोकशाहीचा खुलेआम गळा घोटला. ज्या काँग्रेसने लोकशाही पद्धतीने एका रात्रीत डझनभर वेळा सरकारे बरखास्त केली. ज्या काँग्रेसने देशाची राज्यघटना आणि लोकशाहीची प्रतिष्ठा कैद केली होती. ज्या काँग्रेसने वर्तमानपत्रांना टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. ज्या काँग्रेसने देश तोडण्याचे नवे आख्यान निर्माण केले आहे. जी उत्तर-दक्षिण तोडण्याबाबत बोलत आहे. ती आम्हाला संघराज्यावर व्याख्यान देत आहे. पण ज्या काँग्रेसला आपल्या नेत्याची हमी नाही, आपल्या धोरणाची हमी नाही, ती काँग्रेस मोदींच्या हमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात देश नाराज का झाला? देशाचा एवढा राग का आला? हे सर्व आमच्या म्हणण्यामुळे झाले नाही. तर त्यांच्या स्वतःच्या कृतीमुळे झाले आहे, असा आरोप मोदींनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -