घरदेश-विदेशलोकसभेत मोदींची शेरो शायरी: 'तुम उदास मत होना, अब मै किसी सूरज...

लोकसभेत मोदींची शेरो शायरी: ‘तुम उदास मत होना, अब मै किसी सूरज को डूबने नहीं दूॅंगा’

Subscribe

आज लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेद्र मोदींचे शेवटचे भाषण आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदीं लोकसभेत प्रतिक्रिया देत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपुर्वी मोदींचे हे लोकसभेतील शेवटचे भाषण आहे. यावेळी त्यांनी लोकसभेसाठी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांचे स्वागत केले. लोकसभेत ते आता आपल्या कामांविषयी माहिती देत आहे. आपले लोकसभेतील शेवटचे भाषण करत आहोत. त्यामुळे कामाचा लेखाजोखा करत आहोत, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

नरेंद्र मोदी म्हणाले की, निवडणुका आहेत म्हणूनच जनतेसमोर कामाचा हा लेखाजोखा. जनतेसमोर आम्हाला हिशोब द्यावा लागेल. प्रमाणिकपणा हाच आमच्या सरकारचा गुण. गरीब आणि प्रामाणिक जनतेला लाभ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न होता. साडेचार वर्षापूर्वी काय होते ते आठवा. देशाची अर्थव्यवस्था १० क्रमांकावरुन ६ क्रमांकावर आली. सर्वात जास्त आणि स्वस्त इंटरनेटचा वापर भारतात होतोय.

- Advertisement -

‘विरोधकांना खरं ऐकण्याची सवय नाही’

‘पंतप्रधान आणि राष्ट्रपती देखील खरं बोलतात पण तुम्हाला खरं ऐकण्याची सवय नाही’, असा टोला मोदींनी विरोधकांना दिला. मी मर्यादेमध्ये राहणे हेच चांगले आहे. विरोधक म्हणतात मोदी चौकशी यंत्रणेवर दबाव टाकतात. आणीबाणी कुणी लावली? जवानांचा अपमान कुणी केला? काँग्रेस घटनात्मक संस्थांचा अपमान करते, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

ईव्हीएम संशयामुळे देशाची नाचक्की 

ईव्हीएम संशयामुळे देशाची नाचक्की झाली. ईव्हीएम संशयाचा लंडन येथे पोहोचल्यामुळे देशाची नाचक्की झाली. काँग्रेसने देशाच्या लष्करावर संशय घेतला.

- Advertisement -

५५ वर्षांविरुद्ध ५५ महिने, तुलना करा

‘आम्ही सत्तेत आल्यापासून घराघारात वीज पोहोचवली. उज्वला योजनेअंतर्गत लोकांच्या घरात गॅस दिले. हे काम फक्त ५५ महिन्यांमधील आहे. ५५ वर्षांविरुद्ध ५५ महिने, तुलना करा’, असे मोदी म्हणाले आहेत.

महाआघाडीच्या विरोधात मोदी

नरेंद्र मोदी महाआघाडीच्या विरोधात बोलले आहेत. जेव्हा भेसळ सरकार असते तेव्हा देशाची अधोगती होते. बहूमताच्या सरकारमुळे कामे पटापट होतात.

लोकसभेत मोदींची शेरोशाहीरी

‘जब किसी झूट की बस्ती मे, सच को तडपते देखा है, तब मैंने अपने भीतर किसी बच्चे को सीसकते देखा है!’, अशीच अवस्था माझी झाली आहे.

पैसे पळवून नेणारे ट्विटरवर रडत आहेत

पैसे पळवून नेणारे आता ट्विटरवर रडत आहेत. मी तर ९ हजार कोटींचे कर्ज घेऊन पळालेलो. मोदींनी १३ हजार कोटी केले. पळपुट्या उद्योगपतींना काँग्रेसने परदेशात पळवण्यास मदत केली. पळून गेलेल्या उद्योगपतींना पकडण्यास आम्ही प्रयत्न केला.

‘काँग्रेसच्या काळात सेनेची अवस्था दयनीय’

काँग्रेसच्या काळात सेनेची अवस्था दयनीय होती. काँग्रेस संसरक्ष खात्याची भलाई करायचा मानस ठेवत नाही. आम्ही दोन वर्षात बुलेटप्रूफ जॅकेट मिळवून दिली. तीन दशकात एकही फायटर प्लेन का नाही? याउलट बाजूचा देश पाकिस्तान यात पुढे होता. याअगोदर संरक्षण करार दलालांमार्फत व्हायचे. राफेल कारार होऊ नये, अशी काँग्रेसची इच्छा. देशाची वायूसेना दुबळी राहावी, ही काँग्रेसची इच्छा.

आम्ही मागे हटणार नाही

आम्ही मागे हटणार नाहीत. हे नोटबंधीवालं सरकार आहे, राष्ट्र समर्पित सरकार आहे. परदेशातून येणाऱ्या पैशांवर सरकारची कडी नजर आहे. काळ्यापैशांविरोधत आम्ही लढू. काळे धंदे वाल्यांचा अजिबात गय केले जाणर नाही.

एक इमानदार पंतप्रधान काम करतो तेव्हा…

काँग्रेसच्या मनाविरुद्ध होत आहे. भ्रष्ट्राचार विरोधात काम सुरु होत आहे. तर, अत्यंत अश्लिल भाषेत टीका केली जाते. शिविगाळ देणाऱ्या लोकांना सांगू इच्छितो की, एक इमानदार माणूस काम करतो तेव्हा शिविगाळ केली जाते.

रॉबर्ट वाड्रांवर टीका

नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता रॉबर्ट वाड्रांवर टीका केली आहे. लोकांच्या मोठमोठ्या प्रॉपर्टी बाहेर निघत आहेत.

‘काँग्रेसमध्ये सामील होणं म्हणजे आत्महत्या करणं’

काँग्रेस मुक्त ही माझी नाही तर महात्मा गांधी यांची घोेषणा होती. त्याचबरोबर घटानाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की, काँग्रेसमध्ये सामील होणे म्हणजे आत्महत्या करणे.

जीएसटी विषयी बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही

काँग्रेसच्या काळात महागाई वाढली. परंतु, जीएसटीमुळे अत्यावश्यक वस्तू या कराच्या बाहेर गेल्या. दूधावर कर लावणाऱ्या काँग्रेसवर बोलण्याचा अधिकार नाही.

निवडणुका येणार-जाणार

निवडणुका येणार-जाणार. दोन महिन्यात जितंक काम करता येईल तितकं काम करायचं आहे.आम्ही देशातील १० टक्के गरिबांना आरक्षण दिले. आम्ही गरिबांना आरक्षण देण्याची हिंमत दाखवली.

आम्ही रोजगार दिला

५५ वर्षापासून सत्ता असूनही काँग्रेने रोजगार दिला नाही. देशात असंघटीत क्षेत्र ८० ते ९० टक्के आणि संघटीत क्षेत्रात १० ते १५ टक्के नोकरी देऊ शकता येतं. १५ महिन्यात १ कोटी ८० लाख लोकांचे ईपीएफ कापरायला सुरुवात झाली. २०१४ मध्ये एनपीएसवर रजिस्टर केले गेले. १.८ कोटी लोकांनी ईपीएफ खाते उघडली. ६४ टक्के ईपीएफ खातेदार २८ वर्षाखालील आहेत. वाहन क्षेत्रात चार वर्षात सव्वा कोटी रोजगार दिला. आम्ही असंघटीत क्षेत्रात सर्वाधिक रोजगार दिला. हॉटेल व्यवसायात ५० टक्के वृद्धी झाली. मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्या लोकांची संख्या ४.१५ कोटी. स्किल इंडिया,स्टारटप या योजना स्वयंरोजगारासाठी सुरु केल्या.

‘शेतकऱ्यांचीही आम्हाला चिंता आहे’

शेतकऱ्यांचाही आम्हाला चिंता आहे. आम्ही कर्जमाफीच्या मार्गाने जाऊ शकलो असतो. परंतु, आम्ही शेतकऱ्यांसाठी ९९ योजना लागू केल्या. या योजना हजारो कोटी रुपयांचा लागू केला. आम्ही ऑनलाईन सुविधा सुरु केली जेणेकरुन शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळावा. शेतकरी योजना सम्मान सुरु केली. या योजनेतून ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. कुठल्याही प्रकारची दलाली होणार नाही. काँग्रेसने कर्नाटकात शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती. ही कर्जमाफी ४३ लाख शेतकऱ्यांची होणार होती. मात्र, आता फक्त ५ हजार लोकांची कर्जमाफी झाली आहे. आमची योजना दरवर्षाची योजना आहे.

जग आता भारताचा विचार करतो

आज जगाला भारताची दखल घ्यावी लागते. भारत काय निर्णय घेईल याचा विचार जगातील देश करत असतात. विदेशात राहणारे भारतीय आपली खुप मोठी ताकद आहे. विदेशातील लोक कुंभमेळ्याला येतात.

देशासाठी आम्ही अखंड लढत राहू

२०१४ पासून आम्ही ज्या धोरणाने चालत आहोत. त्या धोरणाने आम्ही लढत राहू. आम्ही देशाला पुढेस नेण्याचा फार प्रयत्न केला आणि करत राहू. देशाचा विकास केला. आम्ही देशासाठी अखंड लढत राहू. देश आमच्यावर विश्वास ठेवेल आणि आम्हाला पुन्हा काम करण्याची संधी देईल.

काँग्रेसवर मोदींचा हल्लाबोल

हा अहंकाराचा प्रभाव आहे. काँग्रेस ४०० वरुन ४० वर आले. देशाला लुटणाऱ्यांना आता घाबरायचे नाही.

मोदींनी शेरो शायरीने भाषण संपवले

सुरज जाएगा भी कहा, उसे यही रहना होगा,

तुम उदास मत होना, अब मै किसी सूरज को डूबने नहीं दूॅंगा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -