घरदेश-विदेशइलॉन मस्क यांना गांजा पडला महागात

इलॉन मस्क यांना गांजा पडला महागात

Subscribe

प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती आणि 'स्पेस एक्स' आणि 'टेस्ला' कंपनीचे संस्थापक इलॉन मस्क यांचा गांजा पितांनाचा फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठवण्यात आली.

प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती आणि ‘स्पेस एक्स’ आणि ‘टेस्ला’ कंपनीचे संस्थापक इलॉन मस्क यांचा गांजा पितांनाचा फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावरून टीकेची झोड उठवण्यात आली. येत्या काळात हे फोटो मस्क यांना महागात पडणार आहेत. याचे कारण म्हणजे अमेरिकेतील सरकारी स्पेस एजन्सी नासा ‘स्पेस एक्स’ आणि ‘टेस्ला’ कंपनीची सुरक्षा व्यवस्था तपासणार आहे. येत्या काळात नासा या दोन कंपन्यांबरोबर एका मोहीमेची सुरुवात करणार असल्याने ही तपासणी केली जाणार असल्याचे नासाकडून सांगण्यात आले. मात्र मस्क यांचे फोटो व्हायरल झाल्यामुळे ही तपासणी करण्यात येणार असल्याचा दावा वाशिंगटन पोस्ट या इंग्रजी वृत्तपत्राने केले आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

जगाचा पाठीवर कुठेही गांजा पिणे हे वाईट समजले जाते. प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती आणि ‘स्पेस एक्स’ आणि ‘टेस्ला’ कंपनीचे संस्थापक इलॉन मस्क यांची कारकीर्द मोठी आहे. इलॉन मस्क यांनी उभारलेल्या दोन्ही कंपन्या नासाबरोबर विविध अंतराळ मोहीमेवर काम करत आहेत. मात्र इलॉन मस्क रेडियोवरील एका कार्यक्रमात गांजा आणि व्हिस्की पितांना दिसले. याच बरोबर इलॉन मस्क यांनी थायलँड येथे गुहेत अडकलेल्या मुलांना वाचवण्यासाठी स्पेस एक्सने मदत केली होती. त्यामुळे इलॉन मस्क यांची एक वेगळी प्रतिमा लोकांसमोर होती.

 

View this post on Instagram

 

#elonmusk

A post shared by Luka Ilich (@cubesfromilich) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -