घरदेश-विदेशइम्रान खान यांच्या शपथविधीसाठी सिद्धू आज पाकिस्तानात

इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी सिद्धू आज पाकिस्तानात

Subscribe

राजकारणी नाही तर मित्राच्या नात्याने आलोयं - नवज्योत सिंग सिद्धू

पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान आज पंतप्रधानाची शपथ घेणार आहेत. इम्रान खान यांच्या शपथविधीत भारतीय माजी क्रिकेटर आणि पंजाब सरकारचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू उपस्थित रहाणार आहेत. राजकारणी नाही तर मित्राच्या नात्याने मी या कार्यक्रमाला उपस्थीत रहत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अटारी वाघा बॉर्डर येथून सिद्धूंनी पाकिस्तानात प्रवेश केला. सिद्धू यांना इम्रान खान कडून निमंत्रण मिळाल्यानंतर एक सदिच्छा दूत म्हणून ते पाकिस्तानात गेले आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर आज इम्रान खान यांचा शपथ समारंभ होणार आहे. सिद्धू बरोबरच माजी क्रिकेटर सुनील गावसकर आणि कपील देव यांनाही इम्रान खान यांच्या कडून निमंत्रण मिळाले होते.

मी एक सदिच्छ दूत म्हणून पाकिस्तानला जातोय. दोन्ही देशांमधील संबध लवकरच सुधारतील अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी काल भारतीय प्रसार माध्यमांना सांगितले.

- Advertisement -

 


पाकिस्तानात पाहोचल्यावर प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना सिद्धू म्हणाले,”मी एक राजकीय व्यक्ती म्हणून आलेलो नाही. मी प्रेम आणि शांतीचा सदिच्छा दूत म्हणून आपल्या मित्राकडे आलो आहे. पाकिस्तानात झालेल्या निवडणुकीमध्ये जिंकून आलेल्या पक्षाला मी शुभेच्छा देतो. खेळा व्यतिरीक्तही इम्रान यांच्यांत बऱ्याच गोष्टी आहेत ज्याने मी प्रभावित होतो. त्यामुळे क्रिकेट खेळतानाही मी इम्रानच्या अधिक जवळ राहण्याचा प्रयत्न करत होतो. इम्रान खान पाकिस्तानचा पंतप्रधान बनला ही माझ्यासाठी अविस्मरणीय गोष्ट आहे. मैत्री आणि विश्वासामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थीत राहिलो आहे. मित्राच्या शपथविधीला उपस्थीत रहातेवेळी मला अभिमान वाटत आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -