घरदेश-विदेश'सिद्धूला माझ्या जागी मुख्यमंत्री व्हायचे आहे'

‘सिद्धूला माझ्या जागी मुख्यमंत्री व्हायचे आहे’

Subscribe

सिद्धू माझ्या जागी मुख्यमंत्री बनू इच्छित आहे. सिद्धू हा काँग्रेसची प्रतिमा मलिन करत आहे. पक्षाने त्यांच्याविरोधात कारवाई केली पाहिजे, असे आरोप पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केलेे. त्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे.

सिद्धूंनी काँग्रेस विचारधारा स्वीकारली असल्यास त्यांनी तक्रारीसाठी निवडणुकीचा काळ निवडला नसता. पतियाळात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जात असलेल्या कॅप्टन यांनी पत्रकारांशी बातचीत करताना हा हल्ला चढवला. सिद्धू विरोधात कारवाई करावी की नाही, हे पार्टीच्या हायकमांडने ठरवावे, परंतु काँग्रेसने शिस्त भंग केल्याचे सहन करू नये.

- Advertisement -

माझी त्यांच्याविरोधात खासगी तक्रार नाही, मी त्यांना लहानपणापासून ओळखतो. ते महत्त्वाकांक्षी आहेत आणि मुख्यमंत्री बनू इच्छितात. तर गेल्या काही दिवसांपूर्वी अमरिंदर सिंग यांनी म्हटले होते की, जर राज्यात काँग्रेस निवडणूक हारली तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन. इतकेच नव्हे, तर त्यांनी सर्वच आमदार आणि मंत्र्यांना काँग्रेसच्या कामगिरीची जबाबदारी सोपवल्याचेही त्यांनी सांगितले होते.

तत्पूर्वी 14 मे रोजी नवज्योत सिंह सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी आरोप केला होता की, अमरिंदर सिंग यांच्यामुळेच पंजाबच्या प्रभारी आशा कुमारी यांना अमृतसर मतदारसंघातून तिकीट मिळाले नाही. परंतु अमरिंदर सिंग यांनी त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावत याच्याशी माझा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही अमृतसरमधल्या बठिंडा जागेवरून त्यांना तिकीट देत होतो. पण ती तिथून निवडणूक लढवण्यास नकार दिला. तिकीट वाटपाचे सर्वच काम दिल्लीतील काँग्रेस नेत्यांकडे होते. त्याच माझी कोणतीही भूमिका नसल्याचे अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -