घरताज्या घडामोडीलग्नात झाला कोरोनाचा शिरकाव, नवरदेवाचा मृत्यू आणि नववधू

लग्नात झाला कोरोनाचा शिरकाव, नवरदेवाचा मृत्यू आणि नववधू

Subscribe

देशात अजूनही कोरोना व्हायरसचा कहर कायम आहे. त्यामुळे कोणताही सोहळा करताना कमीत कमी लोकांच्या उपस्थित साजरा करण्याची अट घातली आहे. पण काही जण याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. दरम्यान एका लग्न सोहळ्यात इतका कोरोनाचा शिरकाव झाला, ज्यामुळे नवरदेवाचा मृत्यू झाला असून नववधूसह ९ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. सध्या कोरोनाची लागण झालेले रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये ही घटना घडली आहे.

१० दिवसांपूर्वी लग्न सोहळा पार पडला होता. दरम्यान पीटीआयच्या माहितीनुसार, ४ डिसेंबरला नवरदेवाचा मृत्यू झाला. त्याला ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. पण तरीही त्यांची कोरोना चाचणी केली गेली नाही. त्यानंतर शंका आल्यानंतर कुटुंबियांची कोरोना चाचणी केली आणि त्यामध्ये ९ लोकं कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

- Advertisement -

मुख्य डॉक्टर अधिकारी डॉ. नीता कुलश्रेष्ठा म्हणाल्या की, ‘२५ डिसेंबरला तरुणाचे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर लगेच तरुणाचे प्रकृती बिघडली आणि ४ डिसेंबरला त्याचा मृत्यू झाला. कोरोना चाचणीत नववधूसह ९ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये नववधूच्या सासूचा देखील समावेश आहे. दरम्यान सध्या सर्वांवर उपचार सुरू आहे. याशिवाय गावातील लोकांची कोरोना चाचणी करण्यासाठी मेडिकल कॅम्प लावला गेला आहे.’

डॉ. नीता पुढे म्हणाल्या की, ‘गावात आरोग्य सेवच्या माध्यमातून कोरोना कॅम्प लावला आहे. ज्यामुळे संपर्कात आलेल्या लोकांना ओळखून त्यांची चाचणी केली जाणार आहे.’ डॉ. नीता यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जिल्ह्यात ३ हजार ६७३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यामध्ये सध्या १७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ब्रिटननंतर ‘या’ देशाकडूनही Pfizer-BioNtechच्या कोरोना लसीला मंजुरी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -