घरदेश-विदेशForbes: जगातील प्रतिभावान महिलांमध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण

Forbes: जगातील प्रतिभावान महिलांमध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण

Subscribe

फोर्ब्सने २०२० वर्षातील सर्वात प्रतिभावान महिलांची यादी जाहीर

फोर्ब्सने २०२० वर्षातील सर्वात प्रतिभावान महिलांची यादी जाहीर केली आहे. यात देशाच्या अर्थ मंत्री निर्मला सीतारमण, अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस, बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार शॉ आणि एचसीएल एंटरप्राईजच्या सीईओ रोशनी नडार मल्होत्रा यांचा समावेश असल्याचे समजतेय. दरम्यान, फोर्ब्सने जाहीर केलेल्या या यादीत सलग दहाव्या वर्षी जर्मनीच्या चान्सलर एजेंला मर्केल अव्वल स्थानी आहेत. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत.

- Advertisement -

जगातील प्रतिभावान महिलांच्या यादीत निर्मला सीतारमण या ४१ व्या स्थानी आहेत. तर अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस तिसऱ्या स्थानी आहेत. तर जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल सलग दहाव्या वर्षी पहिल्या स्थानावर कायम आहेत. नडार मल्होत्रा ५५ व्या तर किरण मजूमदार शॉ ६८ व्या स्थानी आहेत. लॅंडमार्क समूहाच्या प्रमुख रेणुका जगतियानी या यादीत ९८ व्या स्थानी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ व्या वार्षिक ‘फोर्ब्स पावर लिस्ट’ मध्ये ३० देशांमधील महिलांचा समावेश आहे. फोर्ब्सने असे म्हटले की, यामध्ये दहा देशांच्या प्रमुख, ३८ सीईओ आणि ५ मनोरंजन क्षेत्रातील महिलांचा समावेश आहे. त्या वयाने, राष्ट्रीयतेने आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील असतील तरी देखील २०२० सालात आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे.

- Advertisement -

या यादीत बिल आणि मिलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या सहअध्यक्षा मिलिंडा गेट्स (५ व्या स्थानी), अमेरिकन सदनाच्या स्पीकर नैंसी पेलोसी (७ व्या स्थानी), फेसबुकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शेरिल सॅंडबर्ग (२२ व्या स्थानी), बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना ( ३९ व्या स्थानी), ब्रिटनच्या महारानी एलिजाबेथ द्वितीय (४६ व्या स्थानी), सुप्रसिद्ध कलाकार रिहाना (६९ व्या स्थानी) आणि बेयोंसे (७२ व्या स्थानी) यांचा देखील समावेश आहे.


केंद्र सरकारने जाहीर केला कोरोना लसीकरणाचा प्लान
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -