घरदेश-विदेशस्वीस बँकेतील ३०० कोटी रुपयांना कोणीच वाली नाही...

स्वीस बँकेतील ३०० कोटी रुपयांना कोणीच वाली नाही…

Subscribe

थोड्या - थोड्या अंतरानं स्वीस बँकेनं सूचना देऊनही सदर ३०० कोटी रुपयांवर अजूनपर्यंत कोणीही दावा केला नसल्यानचं समोर आलं आहे.

स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये भारतीयांच्या ३०० कोटी रुपयांना कोणीही वाली नसल्याची सध्या स्थिती आहे. तीन वर्षांपूर्वी याबाबत सूचना निर्गमित करण्यात आली होती. स्वित्झर्लंडमध्ये बँकिंग व्यवस्था बघणाऱ्या संस्थेनं २०१५ डिसेंबरमध्ये पहिल्यांदाच या निष्क्रिय खात्यांबद्दल सूचना दिली होती. यामध्ये स्वित्झर्लंडमधील नागरिकांसह सहा भारतीयांचादेखील समावेश आहे. तर काही विदेशी नागरिकांचादेखील समावेश आहे. त्यानंतर थोड्या – थोड्या अंतरानं याबाबत सूचना देऊनही सदर ३०० कोटी रुपयांवर अजूनपर्यंत कोणीही दावा केला नसल्यानचं समोर आलं आहे.

सहा भारतीयांचे डोरमेंट अकाऊंट

स्वीस बँकांमध्ये दावेदार न मिळणाऱ्या खात्यांना डोरमेंट अकाऊंट असं म्हटलं जातं. याची एक यादी काढण्यात आली होती. या खात्यांच्या मालकांचा पत्ता नाही आणि त्यामध्ये स्वित्झर्लंडसह अन्य देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. भारतातील सहा खात्यांचा समावेश असून तीन वर्ष होऊनही कोणीही दावेदार अजून पुढे आलेला नाही. बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, या खात्यांमध्ये ३०० कोटी रुपये इतका निधी आहे.

- Advertisement -

सूचना का काढली?

नियमानुसार, खातेदारांच्या कायदेशीर वारसांना त्यांचा हक्क सांगण्याची संधी मिळावी यासाठी बँकेकडून खात्यांची यादी काढण्यात येते. योग्य दावेदार मिळाल्यानंतर या यादीमधून नाव काढून टाकण्यात येतं. २०१७ मध्ये या यादीमधून ४० खाती आणि दोन सेफ डिपॉझिट बॉक्सची माहिती वगळण्यात आली आहे. त्यानंतरही सूचीमध्ये ३५०० पेक्षा अधिक खाती असून यामध्ये सहा भारतीयांच्या खात्यावर अजूनही कोणीही हक्क सांगितलेला नाही.

कोणाच्या नावावर आहे अकाऊंट?

भारतातील सहा डोरमेंट खात्यांपैकी तीन हे भारतात राहणाऱ्या व्यक्तींचं आहे, तर तीन भारतीय वंशाच्या व्यक्ती असून सध्या त्या दुसऱ्या देशांमध्ये वास्तव्यास आहेत. या खात्यांमध्ये एकूण किती संपत्ती आहे हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र साधारण ३०० कोटी रुपये निधी असल्याचं सांगण्यात आलं आहे. पिअरे वाचेक आणि बर्नेट रोजमॅरी (मुंबई), बहादुरचंद्र सिंह (डेहरादून), डॉ. मोहनलाल (पॅरीस), सुशह योगेश प्रभुदास (लंडन) आणि किशोरलाल (पत्ता माहीत नाही) या भारतीयांचा समावेश आहे.

- Advertisement -

भारतीयांचे साधारण ७ हजार कोटी जमा

स्वीस नॅशनल बँक (एसएनबी) द्वारे देण्यात आलेल्या आकड्यानुसार, स्वीस बँकेत २०१७ मध्ये भारतीयांचा साधारण ५० टक्के संपत्तीचा साठा वाढला आहे. १.०१ अब्ज सीएचएफ (स्वीस फ्रँक) अर्थात ७ हजार कोटी रुपयांवर ही संपत्ती पोहोचली आहे. दरम्यान इतर देशांसह आपला व्यवहार योग्य राहण्यासाठी, आदान – प्रदान आणि अवैधता रोखण्यासाठी स्वित्झर्लंडनं नवे नियम काढले आहेत. त्याप्रमाणेच मनी लॉन्ड्रींग आणि टॅक्स फ्रॉड रोखण्यासाठीदेखील नवे नियम लागू केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -