घरदेश-विदेशआजपासून JEE परीक्षेला सुरूवात; परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी दाखल

आजपासून JEE परीक्षेला सुरूवात; परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी दाखल

Subscribe

देशभरात आज जेईई परीक्षा घेतली जाणार असून आजपासून रोज दोन सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार

आजपासून JEE परिक्षेस सुरूवात झाली असून वेगवेगळ्या राज्यांमधील विद्यार्थी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर दाखल होत आहेत. दरम्यान, कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन परीक्षा केंद्रावर विद्यार्थी करताना दिसत आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे स्कॅनिंग, सॅनिटायझेशन आवर्जून केले जात आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल, ओडिशाबरोबरच देशातील इतर भागांमधून विद्यार्थी परीक्षा केंद्रावर प्रवेश करत आहेत.

देशभरात आज जेईई परीक्षा घेतली जाणार असून आजपासून रोज दोन सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. १ ते ६ सप्टेंबर दरम्यान सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ६ या सत्रांमध्ये जेईईची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना एकत्र न बोलवता काही केंद्रांवर ठराविक अर्धा तासाच्या अंतराने बोलवण्यात आले आहे. त्यामुळे सकाळच्या ९ ते १२ सत्रासाठी सकाळी ७ पासून विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश दिला जाणार असून सर्व खबरदारीचे उपाययोजना त्या ठिकाणी केल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जेईईची परीक्षा घेण्यात येणारे परीक्षा केंद्र वाढवण्यात आले आहेत. आधी ५७० केंद्र होते, ते वाढवून ६६० केंद्रांवर ही परीक्षा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची एका वर्गातील संख्या २४ हून १२ करण्यात आली आहे. त्यामुळे बॅच सुद्धा वाढवण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

 

अडचणींचा सामना करत विद्यार्थी दाखल

सकाळपासूनच विद्यार्थी परिक्षा केंद्रावर येण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थी पालकांना सामना करत केंद्रापर्यत पोहोचावे लागत आहे. लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईच्या परीक्षा केंद्रांवर सकाळी सात वाजता प्रवेश देण्यात आला असून यामध्ये कोणी उरण, पालघर, नवी मुंबईहून मुंबईत पोहोचत आहेत. केंद्रावर पोहोचताना विद्यार्थी आणि पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे.

गोरखपूरमध्ये विद्यार्थ्यांना मदत करणारे स्वयंसेवक

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत विद्यार्थी दाखल

परीक्षा केंद्रांवर सॅनिटायझर आणि इतर उपाययोजना 


JEE, NEET च्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -