घरमहाराष्ट्रE-Pass पासून मुक्तता; Unlock 4 जनतेला दिलासा देणारी नियमावली जाहीर

E-Pass पासून मुक्तता; Unlock 4 जनतेला दिलासा देणारी नियमावली जाहीर

Subscribe

राज्यभर प्रवास करण्यासाठी सक्तीची असलेली ई-पासची अट रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारने अनलॉक ४ संदर्भात नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधने शिथील करण्यात आली आहेत. यामुळे प्रवास करताना आता ई-पासची गरज नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्राने परवानगी दिल्यानंतरही राज्यात ई-पासची अट कायम ठेवण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या टीकेनंतर अखेर राज्य सरकारने ई-पास संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

अनलॉक ४ च्या नियमावलीत खासगी आणि मिनी बसेसना परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल आणि लॉज पूर्णपणे सुरु करण्यास परवानगी देत हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत विमानांची उड्डाण आणि लँडिंगची संख्या १ सप्टेंबरपासून दुप्पट करण्यात येणार आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दररोज १०० उड्डाणे आणि १०० लँडिंगला परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी आतापर्यंत कोरोना संकटामुळे हा आकडा ५०-५० असा होता. मुंबई आणि एमएमआरमध्ये शासकिय कार्यालय ३० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तर, उर्वरित महाराष्ट्रात सरकारी कार्यालयात ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती काम सुरू करता येणार आहे. मात्र, सोशल डिस्टनसिंग आणि मास्क वापरणे बंधनकारक आहे.

- Advertisement -

अनलॉक – ४ मध्ये काय सुरु, काय बंद

  • हॉटेल आणि लॉज १०० टक्के सुरु होणार.
  • शाळा आणि कॉलेज ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार.
  • ३० सप्टेंबरपर्यंत मेट्रो धावणार नाही.
  • खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे.
  • सिनेमागृह ३० सप्टेंबरपर्यंत राहणार बंद राहणार.
  • मंदिर आणि जिमबद्दल अद्याप निर्णय नाही.
  • सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क यावर अजून बंदी
  • मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र येता येणार नाही.
  • मुंबई आणि एमएमआरमध्ये शासकिय कार्यालय ३० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत.
  • उर्वरित महाराष्ट्रात सरकारी कार्यालयात ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती काम सुरू करता येणार आहे.
  • प्रवास करताना चालकासह टॅक्सीत चार तर रिक्षामध्ये तीन प्रवाशांना मुभा
  • खासगी चारचाकी वाहनात चार लोकांना प्रवास करण्याची मुभा.
  • ५० पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येता येणार नाही
  • अंत्यविधीसाठीदेखील २० पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकणार नाहीत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -