घरताज्या घडामोडीब्रिटनहून आलेल्या ६०० पैकी एकालाही कोरोनाचे लक्षण नाही - आयुक्त

ब्रिटनहून आलेल्या ६०० पैकी एकालाही कोरोनाचे लक्षण नाही – आयुक्त

Subscribe

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण जग अलर्ट झाले आहे. मात्र, ब्रिटनहून तीन विमानांनी मुंबईत दाखल झालेल्या ६०० प्रवाशांपैकी एकाही प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण जग अलर्ट झाले आहे. मात्र, ब्रिटनहून तीन विमानांनी मुंबईत दाखल झालेल्या ६०० प्रवाशांपैकी एकाही प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिका, पोलीस, एअरपोर्ट प्रशासन, राज्य व केंद्र सरकार यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र, या सर्व प्रवाशांना केंद्र सरकारच्या आदेशाने क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. सुदैवाने केंद्र शासनाने २३ डिसेंबरपासून ब्रिटनहून भारतात येणाऱ्या विमानांची उड्डाणे रद्द केली आहेत.

६०० प्रवासी मुंबई एअरपोर्टवर दाखल

पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी आणि मंगळवारी रात्रीपर्यंत ब्रिटनहून एकूण पाच विमाने मुंबईत येणार होती. मात्र, पाच ऐवजी तीन विमानेच मुंबईत आली आहेत. या तीन विमानातून एकूण ६०० प्रवासी मुंबई एअरपोर्टवर उतरले. त्यांची तज्ञ डॉक्टरांनी कसून तपासणी केली. मात्र, त्यापैकी एकामध्येही कोरोनाची लागण वा नवीन व्हायरसची लक्षणे आढळून आलेली नाहीत. मात्र, तरीही केंद्र सरकारच्या आदेशावरून सुरक्षेचा उपाय म्हणून या सर्व प्रवाशांना विविध हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

- Advertisement -

राज्यात त्या प्रवाशांना क्वारंटाईन केले जाणार

दरम्यान, मुंबईत ब्रिटनमधून दाखल झालेल्या सर्व हवाई प्रवाशांना तात्काळ तपासून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सोमवारी रात्री काही प्रवाशांनी आमच्याकडे पैसे नसल्याने आम्ही क्वारंटाईन होणार नाही, आम्हाला आमच्या राज्यात घरी जाऊ द्या, असे सांगितले आहे. ज्या प्रवाशांना त्यांच्या राज्यात जायचे आहे त्या राज्याच्या मुख्य सचिवांना तशा सूचना देण्यात आल्या असून त्यांच्या राज्यात त्या प्रवाशांना क्वारंटाईन केले जाणार आहे. तोपर्यंत त्या प्रवाशांना मुंबईत निगराणीखाली ठेवण्यात आल्याचे काकाणी यांनी सांगितले.

ब्रिटन येथून निघालेल्या ३ विमानामध्ये ५९० प्रवासी असून ते मुंबई एअरपोर्टवर उतरले. त्यापैकी ३५४ प्रवासी मुंबईसह महाराष्ट्रातील (मुंबईतील १८७, तर राज्यातील १६७ प्रवासी) आहेत. तर २३६ प्रवासी महाराष्ट्राबाहेरील आहेत.

- Advertisement -

AI – १३० या विमानाने २५० प्रवासी मुंबईत आले. त्यापैकी ६३ मुंबईमधील तर ७५ महाराष्ट्रातील तसेच ११२ राज्याबाहेरील आहेत.
VS – ३५४ या विमानाने ११५ प्रवासी मुंबईत आले. त्यापैकी ५२ मुंबईमधील, ३० महाराष्ट्रातील तर ३३ महाराष्ट्राबाहेरील आहेत.
BA – १३९ या विमानाने २२५ प्रवासी मुंबईत आले. त्यापैकी ७२ मुंबईमधील, ६२ महाराष्ट्रातील तर ९१ प्रवासी महाराष्ट्राबाहेरील आहेत.


हेही वाचा – राज्यात ३,१०६ नवीन रुग्ण, ७५ जणांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -