घरक्रीडाNZ vs PAK : मोहम्मद रिझवानचे अर्धशतक; पाकिस्तानची न्यूझीलंडवर मात  

NZ vs PAK : मोहम्मद रिझवानचे अर्धशतक; पाकिस्तानची न्यूझीलंडवर मात  

Subscribe

रिझवानने ५९ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची खेळी केली.

मोहम्मद रिझवानच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडला ४ विकेट राखून पराभूत केले. मात्र, तीन सामन्यांची ही मालिका पाकिस्तानने १-२ अशी गमावली. पहिल्या दोन सामन्यांत पाकिस्तानच्या संघाला चांगला खेळ करण्यात अपयश आले होते. त्यांचा कर्णधार बाबर आझम दुखापतीमुळे या मालिकेला मुकला आणि याचाच फटका पाकिस्तानला बसला. तिसऱ्या टी-२० सामन्यात मात्र पाकिस्तानच्या खेळाडूंनी त्यांचा खेळ उंचावला.

आझमच्या अनुपस्थितीत शादाब खानला टी-२० मालिकेत पाकिस्तानचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. शादाबने तिसऱ्या टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. न्यूझीलंडने २० षटकांत ७ बाद १७३ अशी धावसंख्या उभारली. त्यांच्याकडून डेवॉन कॉन्वेने ४५ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६३ धावांची खेळी केली. त्याला टीम सायफर्ट (३५) आणि ग्लेन फिलिप्स (३१) यांनी उत्तम साथ दिली. पाककडून फहीम अश्रफने २० धावांत ३ विकेट घेतल्या.

- Advertisement -

१७४ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या डावाची मोहम्मद रिझवानने आक्रमक सुरुवात केली. त्याने ५९ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची खेळी केली. त्याला मोहम्मद हाफिजची (४१) चांगली साथ लाभली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे पाकिस्तानने २ चेंडू आणि ४ विकेट राखून हा सामना जिंकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -