घरदेश-विदेशUdhayanidhi Stalin : मंदिर बांधण्याच्या विरोधात नाही, परंतु मशीद पाडून...; स्टॅलिन यांचे...

Udhayanidhi Stalin : मंदिर बांधण्याच्या विरोधात नाही, परंतु मशीद पाडून…; स्टॅलिन यांचे पुन्हा वादग्रस्त विधान

Subscribe

नवी दिल्ली : रामल्ला येत्या 22 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) विराजमान होणार आहेत. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांचे नेते या सोहळ्यावर निशाणा साधताना दिसत आहेत. तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि 22 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा हिंदू धर्माला लक्ष्य करत वादग्रस्त विधान केले आहे. (Not against building a temple but we do not support demolishing a mosque and building a temple Udayanidhi Stalins controversial statement again)

हेही वाचा – Maharashtra Politics : उत्तर द्या! आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून नवी मोहीम

- Advertisement -

उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, आम्ही किंवा आमच्या पक्षाचे नेते कोणतेही मंदिर बांधण्याच्या विरोधात नाही, परंतु ज्या ठिकाणी मशीद पाडण्यात आली, त्या ठिकाणी मंदिर बांधण्यास आमचे समर्थन नाही. राजकारण आणि धर्म यांची सांगड घालू नये, असा इशाराही उदयनिधी स्टॅलिन  यांनी दिली. तसेच आम्ही कोणत्याही मंदिराच्या विरोधात नाही, मात्र ज्या ठिकाणी पूर्वी असणारे मशीद पाडून मंदिर उभारण्यात आले आहे, त्याचे आम्ही समर्थन करू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका उदयनिधी स्टॅलिन यांनी मांडली.

यापूर्वी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केले होते वादग्रस्त वक्तव्य

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि युवा व्यवहार मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी 2 सप्टेंबर 2023 रोजी एका कार्यक्रमात सनातन धर्मावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी सनातन धर्माचा संबंध डेंग्यू, मलेरिया, कोरोना यांसारख्या साथीच्या आजारांशी जोडला होता. उदयनिधी स्टॅलिन यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपा नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. तसेच उदयनिधी स्टॅलिन यांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पाटणा उच्च न्यायालयातही हजर राहावे लागले होते. पाटणा न्यायालयाने त्यांना समन्स जारी केले असून 13 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Ram Mandir : सपा नेत्याकडून कारसेवकांवरील गोळीबाराचे समर्थन; प्राणप्रतिष्ठेपूर्वी नव्या वादाला फुटणार तोंड?

कारसेवकांवरील गोळीबाराचे सपा नेत्यांकडून समर्थन

दरम्यान, सपाचे सरचिटणीस शिवपाल यादव राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीच वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, संविधानाच्या रक्षणासाठी नेताजी मुलायम सिंह यादव यांनी गोळीबार केला होता. न्यायालयाचा आदेश परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा होता. मात्र कारसेवकांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले होते. कारसेवकांनी मशिदीचे बांधकाम तोडले होते. त्याठिकाणी शांतता राखण्याची जबाबदारी प्रशासनाची होती. त्यामुळे कारसेवकांवर कारवाई व्हायला हवी होती, पण झाली नाही, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे कारसेवकांवर झालेल्या गोळीबाराचे समर्थन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -