घरमहाराष्ट्रVideo: अरे काय बापाचं राज्य आहे काय? प्रवाशाला टीसीकडून बेदम मारहाण, NCP...

Video: अरे काय बापाचं राज्य आहे काय? प्रवाशाला टीसीकडून बेदम मारहाण, NCP चा सरकारला सवाल

Subscribe

राज्यात महायुती सरकार आल्यापासून राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं सतत बोललं जात आहे. विरोधक नेहमीच सरकारवर कायदा सुव्यवस्थेवरून टीका करत असतात.

मुंबई: राज्यात महायुती सरकार आल्यापासून राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं सतत बोललं जात आहे. विरोधक नेहमीच सरकारवर कायदा सुव्यवस्थेवरून टीका करत असतात. आता असाच एक व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादीने सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. (Video What is the father s kingdom Passenger brutally beaten by TC NCP questions Govt)

राष्ट्रवादी शरद पवार गटाने या घटनेचा व्हिडीओ ट्वीट केला आहे आणि त्यात असं म्हटलंय की, अरे काय बापाचं राज्य आहे का? आपल्या अधिकारात दहशत निर्माण करण हे सरकारचं ब्रीदच आहे. आता तेच ब्रीदवाक्य रेल्वेचे टीसी सत्यात आणताना दिसत आहेत. प्रवाशाकडे तिकीट नाही तर त्याला दंड करा, पण याचा अर्थ तुम्ही तुमच्या अधिकाराचा गैरवापर करणार? प्रवाशाच्या कानाखाली हाणायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

हर नारी का सन्मान होना चाहिए ही भाषणबाजी ऐकायला छान वाटते. पण वास्तव किती भयंकर आहे हे सरकारला कधी कळणार? अल्पवयीन मुलीवर घडलेल्या अत्याचाराची ही एकच घटना नाही, तर अशा अनेक घटना देशभरात घडत असतात. दिल्लीतले निर्भया प्रकरण लोक अजूनही विसरलेले नाहीत. महिला सक्षमीकरणासाठी इव्हेंट करताना सरकारला राज्यात ज्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्याबद्दल काहीच वाटत नाही का? यापुढे नुसती स्वप्न दाखवून निवडणुका जिंकता येणार नाहीत, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

- Advertisement -

हा संबंधित व्हिडीओ कुठला आहे आणि कुठल्या प्रवासातील आहे याबाबत कुठलीही माहिती नाही. मात्र, रेल्वे प्रवासात टीसाने प्रवाशांना मारहाण करण्याचा कुठलाही अधिकार त्यांना नाही. प्रवाशांच्या गैरवर्तनाबाबत रेल्वेतील रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला बोलावून कारवाई करता येते. तसंच, प्रवाशाकडे तिकीट नसल्यास दंडही आकारता येतो. मात्र, प्रवाशांना मारहाण करणे संतापजनक आहे.

(हेही वाचा Praniti Shinde : अडचणी निर्माण करूनही ‘रे नगर’ प्रकल्प केला पूर्ण; माकप नेते आडम यांची प्रणिती शिंदेंवर टीका )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -