घरCORONA UPDATEदेशात कोरोनाबाधितांचा आकडा ७५ लाख पार; २४ तासात ५५ हजार नव्या रुग्णांची...

देशात कोरोनाबाधितांचा आकडा ७५ लाख पार; २४ तासात ५५ हजार नव्या रुग्णांची वाढ

Subscribe

देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून हा आकडा आता ७५ लाखांच्या पार गेला आहे. गेल्या २४ तासांत देशामध्ये ५५ हजार ७२२ नव्या रुग्णांची वाढ झाली असून यामध्ये ५७९ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. तसेच आतापर्यंत एकूण ७५ लाख ५० हजार २७३ इतके कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यातील ७ लाख ७२ हजार ०५५ इतके रुग्ण अॅक्टिव्ह असून आतापर्यंत ६६ लाख ६३ हजार ६०८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याची नोंद आहे. दरम्यान, कोरोनामुळे आतापर्यंत १ लाख १४ हजार ६१० जणांचा जीव गमवावा लागला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

हिवाळ्यात कोरोना विषाणू परत येऊ शकतो, असा दावा सरकारच्या वैज्ञानिकांच्या समितीचे प्रमुख सल्लागार के. विजयराघवन यांनी केला आहे. कोरोनाच्या आणखी एका लाटेचा सामना करण्यासाठी जग चांगल्या तयारीत असणे आवश्यक आहे. कोरोनाची संभाव्य लाट सध्याच्या साथीच्या आजारापेक्षा अधिक तीव्र असू शकते. ब्रिटनच्या ‘वैद्यकीय विज्ञान अकादमी’ चेही असेच मत आहे. २०२१ च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात २०२० च्या सुरूवातीला पहिल्या लहरीमध्ये जी परिस्थिती होती त्याप्रमाणेच परिस्थिती असेल, असे वैद्यकीय विज्ञान अकादमीच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा –

‘पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय राज्य शासनाकडे पर्याय नाही’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -