घरताज्या घडामोडीOmicron नंतर कोरोनाचा IHU वेरियंट आला समोर, 46 वेळा झालाय म्युटेट

Omicron नंतर कोरोनाचा IHU वेरियंट आला समोर, 46 वेळा झालाय म्युटेट

Subscribe

देशात कोरोनाची तिसरी लाट आली असून ओमीक्रॉननंतर कोरोनाचा अजून एक नवा वेरियंट फ्रान्समध्ये आढळला आहे. या वेरियंटला शास्त्रज्ञांनी  IHU असे नाव दिले आहे. या वेरियंटने आतापर्यंत 46 वेळा स्वरुप बदलले आहे. लसीलाही न जुमानणाऱ्या या वेरियंटचा संसर्ग वेग कमी असला तरी येत्या काही दिवसात त्याची तीव्रता किती आहे हे कळेल असे तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

डेली मेल या न्यूज वेबसाईटने याबद्दल माहिती दिली आहे. या महितीनुसार Variant IHU चा शोध फ्रान्समध्ये लागला आहे. फ्रान्स मधील मारसैल शहरात या वेरियंटची १२ जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे लागण झालेल्या व्यक्ती या मध्य अफ्रीकेतील कैमरून या देशांमधून आलेल्या आहेत.

- Advertisement -

सध्या तरी IHU हा किती घातक आणि जीवघेणा आहे हे नक्की सांगता येणार नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. कारण फ्रान्समध्ये सध्या ओमीक्रॉनचा कहर आहे. येते दिवसभरातील कोरोना रुग्णांमध्ये ६० टक्के रुग्ण ओमीक्रॉनचे आहेत. IHU चा शोध १० डिसेंबरला Méditerranée Infection Foundation ने लावला होता. हा वेरियंट अजून किती देशांमध्ये पोहचला आहे हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटना या वेरियंटवर संशोधन सुरू असल्याचे जाहीर करुन त्यावर अधिक संशोधन करेल असे IHU चा शोध लावणाऱ्या टीमचे प्रमुख प्रोफेसर फिलिप कोलसन यांनी सांगितले आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -