घरताज्या घडामोडीOmicron Variant: देशातील पहिल्या ओमिक्रॉन रुग्णाच्या मृत्यूची नोंद राजस्थानमध्ये

Omicron Variant: देशातील पहिल्या ओमिक्रॉन रुग्णाच्या मृत्यूची नोंद राजस्थानमध्ये

Subscribe

देशात सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात ६५३ ओमिक्रॉनबाधित आढळले असून यापैकी २५९ रुग्ण रिकव्हर झाले आहेत.

देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा प्रसार २४ राज्यांमध्ये झाला आहे. देशातील ओमिक्रॉनचा पहिला बळी राजस्थानमध्ये गेला आहे. याबाबतची माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या परिषदेत देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत २ हजार १२५ ओमिक्रॉनबाधित आढळले असून यापैकी ८२८ रुग्ण रिकव्हर झाले आहेत. (Omicron Variant India records first Omicron death in Rajasthan)

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये आतापर्यंत १७४ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. देशातील पहिल्या ओमिक्रॉन रुग्णाच्या मृत्यूची नोंद राज्यस्थानमध्ये झाली आहे. राजस्थानच्या उदयपूरमधील ७३ वर्षीय एका रुग्णाचा मृत्यू ओमिक्रॉनमुळे झाला आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाचे सहाय्यक सचिव लव अग्रवाल म्हणाले की, ओमिक्रॉनमुळे मृत्यू झालेला रुग्ण वृद्ध होता. या रुग्णाला मधुमेहसारखा आजार होता.

- Advertisement -

कोरोनाचा नवा व्हेरिएंट १३९ देशांमध्ये पसरला आहे. ४ लाख ७० हजार ४६२ ओमिक्रॉनचे रुग्ण जगात आढळले आहेत. तसेच आतापर्यंत जगात १०८ ओमिक्रॉनबाधितांचा मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण ब्रिटन, डेन्मार्क, अमेरिका, जर्मनी, कॅनडा, नोर्वे येथे आढळले आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत २ लाख ४६ हजार ७८० ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत.

- Advertisement -

देशात सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात ६५३ ओमिक्रॉनबाधित आढळले असून यापैकी २५९ रुग्ण रिकव्हर झाले आहेत. महाराष्ट्र पाठोपाठ दिल्ली, केरळ, राजस्थान, तामिळनाडू येथे १०० हून अधिक ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत.


हेही वाचा – Covid-19 In India: देशातील कोरोनाचा प्रसार धडकी भरवणारा; ८ दिवसांत ६.३ पटीने रुग्णवाढ


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -