घरताज्या घडामोडीCovid-19 In India: देशातील कोरोनाचा प्रसार धडकी भरवणारा; ८ दिवसांत ६.३ पटीने...

Covid-19 In India: देशातील कोरोनाचा प्रसार धडकी भरवणारा; ८ दिवसांत ६.३ पटीने रुग्णवाढ

Subscribe

महाराष्ट्रात सक्रीय रुग्णांची संख्या ६ पटीने वाढली आहे. तर पश्चिम बंगालमधील सक्रीय रुग्णांची संख्या ३.४ पटीने वाढली आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. यामुळे एका आठवड्यात देशात सक्रीय रुग्णांची संख्या ७७ हजारांहून वाढून २ लाख पार झाली आहे. देशातील कोरोना प्रसार हा धडकी भरवणार आहे. कारण गेल्या ८ दिवसांत ६.३ पटीने रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच देशातील २९ डिसेंबरचा पॉझिटिव्हीटी ०.७९ टक्के रेट हा आता ५.०३ टक्के झाला आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

- Advertisement -

आज झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील पत्रकार परिषदेचे आरोग्य मंत्रालयाचे सहाय्यक सचिव लव अग्रवाल म्हणाले की, देशात आज २ लाख १४ हजार सक्रीय रुग्ण आहेत. गेल्या आठवड्यापूर्वी ७७ हजार सक्रीय रुग्ण होते. गेल्या २४ तासांत देशात ५८ हजार ९७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यात देशात २९, ९२५ रुग्णांची दैनंदिन नोंद झाली होती. मात्र आता रुग्णसंख्येचा वेग वाढला आहे. तसेच आता जगभरात दररोज १७.६२ लाख रुग्णांची नोंद होत आहे.

अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात १० हजारांहून अधिक सक्रीय रुग्ण असलेले २ राज्य होते. आता ६ राज्य आहेत. २ राज्यांमध्ये ५ ते १० हजार सक्रीय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात सक्रीय रुग्णांची संख्या ६ पटीने वाढली आहे. तर पश्चिम बंगालमधील सक्रीय रुग्णांची संख्या ३.४ पटीने वाढली आहे. तसेच दिल्लीतील सक्रीय रुग्णांची संख्या ९ पटीने वाढली आहे.

- Advertisement -

देशातील ओमिक्रॉनची स्थिती

देशात आतापर्यंत २ हजार १३५ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ८२८ रुग्ण रिकव्हर झाले आहेत. देशात ओमिक्रॉनमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या उदयपूरमधील ७३ वर्षीय एका रुग्णाचा मृत्यू ओमिक्रॉनमुळे झाला आहे. याबाबत अग्रवाल म्हणाले की, ओमिक्रॉनमुळे मृत्यू झालेला रुग्ण वृद्ध होता. या रुग्णाला मधुमेहसारखा आजार होता.


हेही वाचा – Omicron ओमीक्रॉनचा जगभरात धुमाकूळ, पण शास्त्रज्ञ म्हणताहेत ही आहे गुड न्यूज


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -