घरताज्या घडामोडीOmicron Virus Origin:ऑमीक्रोन उंदरापासून आलाय ?

Omicron Virus Origin:ऑमीक्रोन उंदरापासून आलाय ?

Subscribe

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमीक्रॉनने जगभरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. हा ओमीक्रॉन नेमका आला कुठून यावर आता संशोधक संशोधन करत आहेत.

याचदरम्यान, कोरोना व्हायरसची उत्पती जशी वटवाघळापासून झाली तसाच ओमीक्रॉन हा उंदरापासून आल्याचे प्राथमिक स्तरावरील चाचणीत समोर आले आहे. संशोधकांच्या मते हा व्हेरियंट नॉन ह्यूमन एनिमल स्पीसीज म्हणजेच मानवा व्यतिरिक्त दुसऱ्या जातीतून उत्पतित झालेला आहे. यात तो उंदरापासून आल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान तज्त्रांनुसार हा व्हेरियंट इतर कोणत्याही प्राण्यांपासून उत्पतित होऊ शकतो. यामुळे उंदरापासूनच ओमीक्रॉनची उत्पती झाली याची दाट शक्यता जरी असली तरी ते अधिक स्पष्ट होण्यासाठी अजून काही चाचण्या कराव्या लागणार आहेत.  ओमीक्रॉन जूनोसिस मधून आला असावा असा संशोधकांचा प्राथमिक कयास आहे.

- Advertisement -

(Reverse Zoonosis) जूनोसिस म्हणजे काय?

जूनोसिस म्हणजे प्राण्यांना होणारा आजार. तसेच माणसांमधून प्राण्यांमध्ये जाणारा व्हायरस आणि नंतर प्राण्यांच्या शरीरात म्युटंट होऊन पुन्हा माणसाच्या शरीरात जाणारा व्हायररस.यालाच रिवहर्स जूनोसिस असे म्हणतात.

- Advertisement -

स्क्रिप्स रिसर्च इंन्सिट्यूटचे इम्युनोलॉजिस्ट क्रिस्टीयन अँडरसन यांनी ओमिक्रॉन हा अनेक व्हेरियंटपासून बनल्याचे सांगितले आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसने ३० वेळा रुप बदलले आहे. आता तो ओमीक्रॉनच्या रुपात समोर आला आहे.

तसेच प्रोफेसर रॉबर्ट गॅरी यांच्या मते ओमीक्रॉनमध्ये ३२ पैकी ७ असे म्युटेशन आहेत जे उंदरांना संसर्ग करू शकतात. कोरोनाच्या पहीला व्हेरियंट अल्फामध्ये सात म्युटेशन झाले होते. यामुळे ओमीक्रॉन उंदरांपासून आल्याची शक्यता अधिक असल्याचे गॅरी यांनी म्हटले आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -